Breaking
छत्रपती संभाजीनगरजळगावधुळेनंदुरबारनाशिकमहाराष्ट्र

भुसावळ नगरपालिकेचा लाचखोर पाणीपुरवठा अभियंता सुरेश देशमुखसह दोन कर्मचारी जळगांव एसीबीच्या जाळ्यात.

0 7 6 6 4 5

उपसंपादक – कल्पेश महाले 

भुसावळ – येथील तक्रारदार पुरुष, वय-४६ वर्षे असून तक्रारदार हे प्लंबर असून त्याचे प्रत्येक वर्षाला लायसन्स नुतनिकरण करावे लागते. त्यासाठी तक्रारदार हे काल दिनांक २३/०४/२०२५ रोजी पाणी पुरवठा विभाग भुसावळ येथे गेले असता यातील आरोपी क्र.१)शाम समाधान साबळे, वय-२८ वर्ष, धंदा-नोकरी, नगरपालिका भुसावळ पाणीपुरवठा विभाग, कंत्राटी कामगार याने पंचासमक्ष ७०० रुपये लाचेची मागणी केली होती.

असे आहे लाच प्रकरण

त्यानंतर आरोपी क्र.१)शाम समाधान साबळे याने आरोपी क्र.२)सतिष सुरेशराव देशमुख, अभियंता पाणीपुरवठा विभाग, नगरपालिका भुसावळ, वर्ग 3 याला कॉल केला असता आरोपी क्र.२ याने ६००/- रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे आरोपी क्र.१ यांचेकडेस लाचेची रक्कम ६००/- रुपये घेवून गेले असता आरोपी क्र.1 यांनी आरोपी क्र.३)शांताराम उर्खडु सुरवाडे , वय ५७ वर्ष, धंदा नोकरी, लिपीक पाणी पुरवठा विभाग, नगरपालिका भुसावळ, भुसावळ, वर्ग 4 याला कॉल करून साहेबांनी ६००/- रुपये घेण्यास सांगितले आहे असे सांगून त्यांना लाचेची रक्कम घेण्यास सांगितले, त्यानंतर आरोपी क्र.३ याने सदरची लाच रक्कम स्विकारली म्हणून त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे.

त्यानंतर शांताराम उर्खडु सुरवाडे, लिपीक पाणीपुरवठा विभाग नगरपालिका भुसावळ याच्यासह सतिष सुरेशराव देशमुख, अभियंता पाणीपुरवठा विभाग, नगरपालिका भुसावळ व श्याम समाधान साबळे, कंत्राटी कामगार पाणीपुरवठा विभाग, नगरपालिका भुसावळ या दोघांना एसीबी कडून अटक करण्यात आली असून सर्व आरोपींविरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशन जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून यानंतर सर्व आरोपींची घरझडती सुरू आहे.

आरोपींकडून मोबाईलवर रोकड जप्त

यावेळी अंगझडती – आरोपी क्र.१ याचे अंगझडतीत vivo कंपनीचा मोबाईल मिळून आला, आरोपी क्र. २ याचे अंगझडतीत २१६० रुपये व वन प्लस मोबाईल,आरोपी क्र. ३ यांचे अंगझडतीत १००० रुपये व vivo कंपनीचा मोबाईल मिळून आला आहे, सदर मोबाईल ताब्यात घेण्यात आले पुढील चौकशी चालू आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई

ही कारवाई जळगांव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र च्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ला.प्र.वि.जळगाव पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, सहा.पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील(चालक), सहा.पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना. बाळू मराठे, पो.कॉ.राकेश दुसाने पो.कॉ. प्रदिप पोळ यांच्या पथकाने केली.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 6 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे