वाघळी येथील अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर चाळीसगाव ग्रामीण पोलीसांचा छापा; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त.

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – घरगुती गॅस अवैधरीत्या चारचाकी वाहनांमध्ये भरण्यात येणाऱ्या सेंटरवर चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी छापा टाकून ३६०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आज दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील वाघळी येथील यशवंत इंग्लिश स्कुल जवळ अवैध गॅस रिफिलिंग करणार्या दुकानावर चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी छापा टाकून ही कारवाई केली. यामध्ये ९ घरगुती सिलिंडरसह वाहनांमध्ये गॅस भरणारे मशीन असा एकूण ३६०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी फकीर आशिक हमीद शहा हा अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस वाहनामध्ये भरण्यासाठी एकूण ९ सिलेंडरसह एक गॅस भरणारे मशिनसह मिळून आल्याने त्याच्यावर गुन्हा रजि. १२४/२५ ई.सी. कलम ३,७ तसेच भा.न्या.सं नुसार २८७,२८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, तालुका पुरवठा अधिकारी जोस्त्ना हनुवते, पो.हे.कॉ.गोवर्धन बोरसे, पो.हे.कॉ. ओंकार सुतार, पो.कॉ. प्रदिप पवार, वाघळी पोलीस पाटील जयश्री बऱ्हाटे, पंच गणपत बऱ्हाटे, विकास चौधरी यावेळी उपस्थित होते.