शिक्षकी पेशाला काळीमा! दोन शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या आईवरच अत्याचार

उपसंपादक – कल्पेश महाले
वर्गशिक्षक समाधान इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे यांच्यावर मलकापूर पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
मलकापूर – शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. दोन शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आईवरच बलात्कार केल्याची समोर आली आहे. बुलडाण्याच्या मलकापूर येथे ही घडली आहे. या प्रकरणी वर्गशिक्षकासह सहकारी शिक्षकांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.
“तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊन पहिला नंबर आणू, यासाठी तू आम्हाला खुष कर”, अशी शरीर सुखाची मागणी वर्ग शिक्षकाने आणि त्याच्या सहकारी शिक्षकाने केली. अशारितीने दोन शिक्षकांनी वर्गातील विद्यार्थ्याच्या आईवरच वेळोवेळी दोन्ही शिक्षकांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
मलकापूर येथील नूतन विद्यालयातील सहाय्यक शिक्षक समाधान इंगळे आणि सहाय्यक शिक्षक अनिल थाटे या दोन्ही आरोपी शिक्षकांनी ३४ वर्षीय पीडित महिलेला आमिष दाखवून बळजबरीने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तसेच त्या दोघांना खूश ठेवले नाही तर तिला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली.
याप्रकरणी वर्गशिक्षक समाधान इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे यांच्यावर मलकापूर पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे मलकापूरसह शाळा परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीसांनी दोन्ही शिक्षकांना अटक केली आणि त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपी शिक्षकांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.