जळगाव
भडगांव येथे रमजान ईदच्या निमित्ताने शीरखुर्माचा कार्यक्रम संपन्न.

0
7
5
0
2
3
(प्रतिनिधी – इमरान शेख)
भडगांव – शहरात रमजान ईद च्या निमित्ताने शीरखुर्माच्या कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी भेट दिली व सर्व मुस्लीम बांधवाना ईदच्या शुभेच्छा दिल्यात. तसेच सर्व समाज बांधवांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांकडून आमदार किशोर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी भडगांव पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, भडगांव समन्वय समिती अध्यक्ष युवराज पाटील, शिवसेना शहरप्रमुख आबा चौधरी, शिवसेना शहरप्रमुख बबलू देवरे, माजी नगरसेवक संतोष महाजन, आसिम शेख, फिरोज भाऊ, नाजिम भाई, मुबीन भाऊ, जितू आचारी, रावसाहेब पाटील, योगेश गंजे, महेंद्र ततार तसेच सर्व मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
0
7
5
0
2
3