जळगांवच्या अतिरिक्त आरोग्य अधिकाऱ्याला १५ हजार रुपयांची लाच घेतांना जळगांव एसीबी कडून अटक

उपसंपादक – कल्पेश महाले
जळगांव- येथील तक्रारदार हे ४४ वर्षीय असून हे जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा परिषद जळगाव येथे वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांची सेवांतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पालघर येथे प्रतिनियुक्ती झालेली आहे. त्यांना प्रतिनियुक्तीचे ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठीचा प्रस्ताव डॉ. सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्फतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांना सादर करण्यासाठी आरोपी डॉ.जयवंत जुलाल मोरे, वय ४६, पद- अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद, जळगाव ( वर्ग 1 आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव) याने डॉ. सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नावाने ३० हजार रुपयांची लाचची मागणी केली होती.
त्याबाबत तक्रारदार यांनी दिनांक ०३/०४/२०२५ रोजी जळगांव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचमागणी पडताळणी दरम्यान दि.०३/०४/२०२५ व दिनांक ०४/०४/२०२५ रोजी पंचासमक्ष लाचमागणी पडताळणी दरम्यान डॉ.जयवंत जुलाल मोरे, वय ४६, पद- अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद, जळगाव याने तक्रारदार यांना सेवांतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पालघर येथे प्रतिनियुक्तीचे ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठीचा प्रस्ताव सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्फतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांना सादर करण्यासाठी डॉ. सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नावे प्रथम ३० हजार रुपयांची लाच मागणी करून तडजोडीअंती तक्रारदार यांच्या कडून १५००० हजार रुपये लाचेची रक्कम रंगेहात स्वीकारताना आरोपी डॉ.जयवंत मोरे याला शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता एसीबी पथकाने पकडले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अतिरिक्त आरोग्य अधिकारी आरोपी डॉ.जयवंत मोरे याला १ लाख रुपये महिना पगार आहे. या प्रकरणी एसीबीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायकर यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
दोघांना नेले एसीबी कार्यालयात
जिल्हा परिषदेच्या आवारात सापळा रचल्यानंतर एसीबी पथकाने डॉ.सचिन भायकर व डॉ. जयवंत मोरे यांना ताब्यात घेऊन एसीबी कार्यालयात नेले. त्यानंतर डॉ. मोरे याच्या घराची झडती घेण्यात आली. त्यादरम्यान या दोघांना एसीबी कार्यालयात बसून ठेवण्यात आले होते. या कारवाईमुळे आरोग्य विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जळगांव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखालीपोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील(चालक), हे.कॉ.महाजन,पो.कॉ. सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.