
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – आज दिनांक २२/१०/२०२४ रोजी दुपारी चाळीसगाव ग्रामीण पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार हे पोलीस पथकासोबत नाकाबंदी करत असताना नागद वरुन चाळीसगावच्या दिशेने येणाऱ्या महिंद्रा TUV 300 GJ 19 AM 0788 या गाडीची तपासणी केली असता गाडीत ७,२२,५००/- रुपये मिळून आले, सदर रकमेबाबत कोणतीही अधिकृत कागदपत्रे सादर न केल्यामुळे व सोबत न बाळगल्यामुळे सदरची रक्कम ही पुढील कारवाई कामी जप्त करण्यात आली असून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत ट्रेझरी शाखा येथे जमा करण्यात आली आहे .आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील रोख रक्कम जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई आहे .
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार, पो.हवा.गोवर्धन बोरसे, कैलास पाटील, संदीप पाटील, पो.कॉ.अकरम बेग, मनोज चव्हाण, प्रदीप पवार, व ग्रामविकास अधिकारी आबासाहेब माळी यांनी सदरची कारवाई केलेली आहे.