Breaking
ब्रेकिंग

लग्नसमारंभात गावठी कट्टा ताडे येथे युवक अटकेत; कासोदा पोलिसांच्या दणका…!

लग्नसमारंभात गावठी कट्टा ताडे येथे युवक अटकेत; कासोदा पोलिसांच्या दणका...!

0 9 7 7 4 0

ताडे ता. एरंडोल येथे , ०३/०५/२०२६ रोजी: लग्नाच्या हळदी समारंभासारख्या आनंदाच्या वातावरणात गावठी कट्टा  बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आले असून, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार

दिनांक ०३/०५/२०२६ रोजी ताडे ता. एरंडोल येथे हळदी समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून पाहुणे आले होते.. त्यामध्ये लखन प्रकाश वाघ रा. परधाडे ता. पाचोरा असा युवक देखील उपस्थित होता. रात्री अंदाजे ११:३० वाजेच्या सुमारास हळदी कार्यक्रमादरम्यान बँडवर नाचत असताना काही नागरिकांना लखन प्रकाश वाघ याच्या कमरेला गावठी कट्टा (अग्निशस्त्र/पिस्टल) लावलेला दिसून आला त्याबाबत उपस्थित लोकांनी त्याचेकडे विचारणा केली असता, तो गर्दीचा फायदा घेऊन तेथून पसार झाला.

सदर बाब कासोदा पोलीस स्टेशनला कळताच आरोपीचा शोध सुरू करण्यात आला दरम्यान दिनांक ०५/०६/२०२५ रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लखन प्रकाश वाघ नामे इसम हा पुन्हा ताडे गावात गुन्हा करण्याच्या उद्देशाने कमरेला गावठी कट्टा बाळगून संशयास्पदरीत्या फिरत आहे.

मिळालेल्या माहितीची पडताळणी करुन सपोनि श्रीकांत पाटील यांनी आपले अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोकॉ/१६६७ निलेश गायकवाड, पोकॉ/१९९७ योगेश पाटील, पोकॉ/१२६० सोनू पाचुंदे यांची टीम तयार करून इसमांस पकडण्यासाठी सापळा रचत त्यांला भातखेडे चौफुली येथुन इसम नामे लखन प्रकाश वाघ रा. परधाडे ता. पाचोरा यास ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी कट्टा (अग्निशस्त्र/पिस्टल) तसेच एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. सदर आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी कासोदा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून त्याच्याविरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, श्रीमती/कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजयकुमार ठाकुरवाड मा. उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि श्रीकांत पाटील नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोकॉ/१६६७ निलेश गायकवाड, पोकॉ/१९९७ योगेश पाटील, पोकॉ/१२६० सोनू पाचुंद पथकाने उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 7 7 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे