Breaking
ब्रेकिंग

जळगाव जिल्हा पोलिसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन…!

जळगाव जिल्हा पोलिसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन...!

1 0 2 7 2 8

जिल्हा प्रतिनिधी :-  सैय्यद कलिम

जळगाव: -वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. सोशल मीडिया, बँक आणि पार्सलच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे

या फसवणुकींपासून सावध राहा:

बनावट कॉल आणि डिजिटल अटक डिजिटल अरेरेस्ट पोलीस, सीबीआय, किंवा कस्टम अधिकारी असल्याचे सांगून धमकावणे आणि डिजिटल अटकेची भीती दाखवून पैसे उकळणे.पैसे पाठवणे QR कोडे स्कॅन अनोळखी व्यक्तींनी पाठवलेला QR कोड स्कॅन करून पैसे पाठवणे किंवा अनोळखी लिंकवर क्लिक करणे.

लॉटरी आणि नोकरीचे आमिष घरबसल्या किंवा पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली किंवा लॉटरी लागल्याचे सांगून बँक खात्याची माहिती मागणे.बँक KYC अपडेट: बँकेचा खाते क्रमांक, OTP, UPI PIN, किंवा CVV अपडेट करायला सांगून फसवणूक करणे.

जळगाव पोलिसांच्या महत्त्वाच्या सूचना:

तुमचा OTP, PIN, CVV, किंवा पासवर्ड कोणाशीही बँक कर्मचाऱ्यांसह  शेअर करू नका.कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून मोबाईलमध्ये अन्यडेस्क किंवा टीमवीदेवर सारखे स्क्रीन शेअरिंग ॲप्स डाउनलोड करू नका.बँक किंवा कोणत्याही अधिकृत संस्थेच्या नावाने येणाऱ्या संशयास्पद कॉल्सवर किंवा मेसेजवर त्वरित विश्वास ठेवू नका.

फसवणूक झाल्यास काय करावे?

आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर सायबर हेल्पलाईन ला संपर्क साधा.तसेच अधिकृत National सायबर क्रिमी रिपोर्टींग पोर्टल वर जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 2 7 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे