जळगाव
आयपीएस अभयसिंह देशमुख यांची पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नती

0
7
5
1
4
1
(उपसंपादक – कल्पेश महाले)
चाळीसगांव:- चाळीसगांव उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस अभयसिंह बाळासाहेब देशमुख यांची पदोन्नतीवर पोलीस अधीक्षक म्हणून शस्त्र निरीक्षण शाखा पुणे येथे नुकतीच बदली झाली आहे.
पोलीस विभागातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे चाळीसगांव येथील कार्यकाळात अभयसिंग देशमुख यांनी एक नैतिक आणि प्रशासकीय दरारा निर्माण केलेला आहे. पोलीस विभागात अतिशय प्रामाणिकपणे व पारदर्शक काम करणारे अभयसिंह देशमुख यांची चाळीसगांव येथून नुकतीच पदोन्नतीवर बदली झाली ही अतिशय आनंदाची बातमी असली तरी एक उत्कृष्ट पोलीस अधिकारी चाळीसगांव येथून गेल्याचे दुःख निश्चितपणे चाळीसगांवकरांना असणार आहे. पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल अभयसिंग देशमुख यांचे सत्यकाम न्युज महाराष्ट्र च्या वतीने हार्दिक अभिनंदन!
0
7
5
1
4
1