Breaking
जळगाव

क्रिकेट स्पर्धेच्या वादातून मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचा खून.

0 5 3 3 8 6

क्रिकेट स्पर्धेच्या वादातून मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचा खून.

प्रतिनिधी कल्पेश महाले.

क्रिकेट स्पर्धेच्या झालेल्या वादातून मुंबई पोलीस दलात कर्मचारी असलेल्या तरूणाचा धारदार तलवारीने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात रविवारी १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. मयताचे नाव शुभम अर्जुन आगोणे (वय-२८ रा. चाळीसगाव) असे आहे.

क्रिकेट खेळत असताना मयत शुभम आगोणे यांचे एका गटासोबत किरकोळ वाद झाला होता. दरम्यान रविवारी १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा वाद उफाळून आला. यात चार जणांनी शुभमवर धारदार तलवारीने सपासप वार करून गंभीर जखमी केले. ही घटना पाटणादेवी रोडवरील बामोशी बाबा दर्ग्याजवळ घडली. यात रक्तांच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमला काही नागरीकांनी तातडीने खासगी वाहनातून शहरातील खासगी रूग्णालयात हलविले. यावेळी डॉ. देवरे यांनी शुभम ला मयत घोषीत केले. ही वार्ता शुभम च्या नातेवाईकांना कळताच त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी करत एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.

चाळीसगाव शहरात खूनाची घटना घडल्यानंतर चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील व सहकार्‍यांनी खुनाची माहिती कळताच धाव घेतली. घटनेचा पंचनामा केल्यानंतर शहर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविल्यानंतर चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे कामसुरू होते.

4/5 - (4 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 3 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे