महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना कजगाव मध्ये सर्रासपणे गुटखा विक्री…..
प्रतिनिधी – संजय महाजन (कजगावं)
राज्यात गुटखा बंदी असल्यावरही कजगाव येथे मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री केली जात आहे. रात्री – बेरात्री होलसेल व किरकोळ व्यापारी हे कजगाव मधूनच तालुक्यात गुटखा सप्लाय करत असल्याची खमंग चर्चा आहे. तर या व्यावसायिकांना अभय कोण देत आहे असा प्रश्न कजगांव येथील सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी आहे. प्रतेक पान टपरी छोट्या मोठ्या दुकानात. गुटख्याच्या पुड्यांची माळा टांगलेली दिसते. एवढेच नाही तर परिसरात अनेक प्रकारच्या गुटख्याच्या खाली पिशव्या पडलेल्या दिसतात. राज्यात गुटखा बंदी आल्यावरही खुलेआम गुटखा विक्री हे अन्न व औषध प्रशासनाला दिसत नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या काही महिन्यात अन्न प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली अशी एक सुद्धा बातमी कानावर आलेली नाही. तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने सुध्धा गुटखा विक्रेत्यांवर कारवाई झाल्याचे कुठंही आढळून आले नाही. बेकायदा गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलीस व अन्न प्रशासन कारवाई का करत नाही? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.
गुटख्यामुळे तोंडाचा कॅन्सर व अनेक तोंडाचे आजार होण्याचा धोका वाढतो तसेच अन्ननलिका अल्सर चा कॅन्सर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असतो. तरीही शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री केला जात आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने कजगाव येथे मोठ्या प्रमाणावर गुटखा ची तस्करी करणाऱ्या होलसेलर व किरकोळ व्यापार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे.