भारतीय दलित साहित्य अकादमी तर्फे गुणगौरव पुरस्काराने श्री वाल्मीक फासगे सन्मानित…

भारतीय दलित साहित्य अकादमी तर्फे गुणगौरव पुरस्काराने श्री वाल्मीक फासगे सन्मानित…
प्रतिनिधी कलीम सैय्यद.
चाळिसगाव तालुक्यातील खेडगाव येथील श्री वाल्मीक फासगे यांना भारतीय दलित साहित्य अकादमी तर्फे गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे भारतीय दलित साहित्य अकादमी पुरस्कार दिनांक ३० जून रोजी संपन्न झाला. मा.दीपचंद शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली शाखेचे भारतीय दलित साहित्य अकादमी तर्फे गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
विविध क्षेत्रातील मान्यवर, कवी, सैनिक, क्रिकेटपटू, कलावंत, साहित्यक, अनेक गुणवंतांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
भारतीय दलित साहित्य अकादमीचे मा.नेवालाल पाथरे, मा.खडसे, मा.चंद्रकांत रामटेक, मा.राजूजी अग्रवाल, देश रक्षक निवृत्त सेनानी अॅड.ओंकारेश्वर जी काकडे, अॅड.शैलेश जी ननावरे यांच्या हस्ते श्री वाल्मीक फासगे शाहिरास प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन देऊन गौरवण्यात आले.