Breaking
ब्रेकिंग

गुटखा विक्रेत्यांची खैर नाही !आता जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना थेट ‘मोक्का’चा फटका बसणार अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत…!

गुटखा विक्रेत्यांची खैर नाही !आता जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना थेट 'मोक्का'चा फटका बसणार अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत...!

1 0 1 2 1 3

जिल्हा प्रतिनिधी :-  सैय्यद कलीम

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अत्यंत महत्त्वाची आणि धाडसी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात बंदी असतानाही गुटखा विक्री करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार असून, गुटखा विकणारे दुकानदार, घाऊक विक्रेते (होलसेलर) तसेच त्याची निर्मिती करणाऱ्या संबंधित घटकांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गुटखा हे केवळ व्यसन नाही, तर तो मृत्यूचे निमंत्रण आहे. तोंडाचा कर्करोग, घशाचे गंभीर आजार, दात व हिरड्यांचे विकार आणि अनेक जीवघेणे आजार या विषारी पदार्थामुळे होत आहेत. कित्येक कुटुंबांनी आपल्या प्रिय व्यक्तींना या व्यसनामुळे गमावले आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांनी या विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तात्काळ हे आदेश पारित केले आहेत

महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही काही लोक फक्त पैशाच्या हव्यासापोटी समाजाच्या आरोग्याशी  खेळत आहेत. अशा लोकांविरोधात कठोर भूमिका घेण्याची वेळ आता आली होती आणि तुकाराम मुंढे यांनी ती घेतली आहे.

कायद्याचा धाक निर्माण झाला तरच गुटखा माफियांचे जाळे उद्ध्वस्त होईल आणि हजारो तरुणांचे आयुष्य वाचेल.

हा निर्णय केवळ प्रशासकीय नाही, तर भावी पिढीला वाचवण्याचा एक निर्धार आहे.व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी कठोर निर्णय आवश्यक आहेत!”

तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या या कठोर निर्णयाला तुमचा पाठिंबा आहे का?

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 1 2 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे