सेवा, समर्पण आणि नेतृत्व… गिरीशभाऊ महाजन यांनी पुन्हा जिंकली वारकऱ्यांची मने…!
सेवा, समर्पण आणि नेतृत्व... गिरीशभाऊ महाजन यांनी पुन्हा जिंकली वारकऱ्यांची मने...!

जिल्हा प्रतिनिधी :- कलिम सैय्यद
दरवर्षीप्रमाणे आषाढी वारीसाठी पंढरपुरात यंदा लाखो वारकरी दाखल झाले. एवढ्या प्रचंड गर्दीत प्रत्येक भाविकाला सुरक्षित दर्शन मिळावे, यासाठी सलग दुसऱ्या वर्षी नामदार गिरीशभाऊ महाजन स्वतः मैदानात उतरले. तब्बल १२ ते १४ तास पोलिसांसोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी गर्दी नियोजनाची जबाबदारी सांभाळली.
महाद्वार परिसर, नियंत्रण मनोरा आणि आपत्कालीन नियंत्रण कक्षातून त्यांनी सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. केवळ आदेश देणारे नव्हे, तर प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून जबाबदारी पार पाडणारे नेतृत्व म्हणून गिरीशभाऊ महाजन यांनी पुन्हा एकदा वेगळी छाप पाडली.
वारकऱ्यांची सुरक्षितता, पोलिसांचे मनोबल आणि सुरळीत व्यवस्थापन यांना सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी केलेली सेवा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. जनतेच्या सेवेसाठी सदैव मैदानात असलेले गिरीशभाऊ महाजन हेच त्यांच्या कार्यशैलीचे खरे वैशिष्ट्य आहे..



