CCTV आणि गोपनीय माहितीच्या आधारे कासोदा पोलिसांचा मोठा गौप्यस्फोट; मध्यप्रदेशातील आरोपींकडून 47,630 रु. हस्तगत…!
CCTV आणि गोपनीय माहितीच्या आधारे कासोदा पोलिसांचा मोठा गौप्यस्फोट; मध्यप्रदेशातील आरोपींकडून 47,630 रु. हस्तगत...!

इमरान शेख उपसंपादक
कासोदा दि. 10/08/2026 रोजी कासोदा शहरात बँकेतून पैसे काढून निघालेल्या महिलेच्या पिशवीतून चोरी झालेली 47,630 रुपयांची संपूर्ण रक्कम कासोदा पोलिसांनी CCTV फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसात हस्तगत केली. मध्यप्रदेशातील दोन आरोपींना जेरबंद करून रक्कम मूळ तक्रारदाराला परत करण्यात आली.
असा होता घटनाक्रम
दिनांक 21/07/2026 रोजी सकाळी 10.00 वाजता आशाबाई बाबुलाल देवरे, वय 50 वर्षे, रा. सोनबर्डी ता. एरंडोल* या कासोदा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधून पैसे काढून पंखा दुरुस्तीसाठी जात होत्या. याच दरम्यान आरोपींनी त्यांच्या साडीवर मुद्दाम घाण टाकून त्यांचे लक्ष विचलित केले. साडी साफ करताना त्यांनी पैशांची पिशवी एका दुकानाच्या बाकड्यावर ठेवली. त्याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पिशवीतील रोख 47,630/- रुपये लंपास केले. याप्रकरणी कासोदा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 109/2026, BNS कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
CCTV आणि गोपनीय माहितीने उघडले प्रकरण
तपासादरम्यान मिळालेल्या CCTV फुटेजचे बारकाईने विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे *निखिल सिसोदिया व आलोक सिसोदिया, रा. सासी कडिया, जि. राजगड, मध्यप्रदेश हे दोघे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजयकुमार ठाकूरवाड* यांच्या मार्गदर्शनाखाली API श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने मध्यप्रदेश येथे धाव घेतली.
पथकाने दोन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम 47,630/- रुपये* हस्तगत करण्यात यश मिळवले.
तक्रारदार भावुक, पोलिसांचे आभार
हस्तगत केलेली संपूर्ण रक्कम आज तक्रारदार आशाबाई देवरे* यांना परत करण्यात आली. चोरीची रक्कम परत मिळाल्याने त्या भावुक झाल्या आणि त्यांनी कासोदा पोलिसांचे मनापासून आभार मानून समाधान व्यक्त केले.
तपास पथक HC नंदलाल परदेशी, PC दीपक देसले, PC स्वप्नील परदेशी – कासोदा पोलीस स्टेशन, PC हरीश परदेशी – पाचोरा पोलीस स्टेशन. तपासात विशेष परिश्रम HC राकेश खोंडे यांनी घेतले.
जलद तांत्रिक तपास आणि तत्परतेमुळे कासोदा पोलिसांनी चोरीचा छडा लावत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे.



