Breaking
छत्रपती संभाजीनगरजळगावधुळेनंदुरबारनाशिकब्रेकिंगमहाराष्ट्र

निवासी उपजिल्हाधिकारी एसीबीच्या जाळ्यात: शेतजमिनीच्या कामासाठी ४१ लाखांची मागणी; २३ लाख घेतले, ५ लाख घेताना रंगेहात अटक.

0 7 9 6 4 3

उपसंपादक – कल्पेश महाले

छत्रपती संभाजीनगर –  छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना लाच घेताना एसीबीने अटक केली आहे. आरडीसी महोदयांनी शेतजमिनीच्या कामासाठी ४१ लाखांची मागणी केली होती. यातील ५ लाख रुपये घेताना एसीबीने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराला वर्ग २ ची जमीन वर्ग १ करायची होती. ती करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी तक्रारदाराकडे मोठ्या लाचेची मागणी केली होती. त्यांनी संबंधिताकडे सदरील काम करून देण्यासाठी ४१ लाख रुपये मागितले होते. त्यातील २३ लाख रुपये संबधित तक्रारदाराकडून आधीच घेतले होते. मात्र, तरीही १८ लाखांची पुन्हा मागणी करण्यात आली. त्यातील ५ लाख रुपयांची लाच घेताना आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अव्वल कारकुनामार्फत ही लाच घेण्यात येत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आरडीसी यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत सरकारी अधिकाऱ्यांकडून लाच घेण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. ग्रामसेवकापासून ते तहसीलदारांपर्यंत अनेकांवर एसीबीने कारवाई केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. काही दिवसांपूर्वीच परभणी जिल्ह्यात देखील महिला क्रीडा अधिकारीलाही लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासी उपजिल्हाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अव्वल कारकून त्रिभुवन यांच्यामार्फत ही लाच घेतली जात होती.

4.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 6 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे