दुचाकी चोरी करणारे तीन आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – चाळीसगाव परिसरात दुचाकी चोरी करणारे तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या असून या चोरट्यांच्या अटकेमुळे चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पथकास बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ रा सोनगाव ता मालेगाव हा त्याचा साथीदार आकाश गोविंद गायकवाड रा.जळगाव फाटा निफाड, व दादु संजय सोनवणे रा. दरेगाव ता मालेगाव यांच्या सोबत मोटार सायकल चोरी करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरून सदर पथकाने भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ रा.सोनगाव ता.मालेगाव याबाबत माहिती काढून तो जळगाव फाटा, निफाड ता. निफाड येथे मिळुन आला. त्याचा साथीदार आकाश गोविंद गायकवाड रा.जळगाव फाटा निफाड, हा सटाणा ता.सटाणा येथे मिळुन आला तसेच दुसरा साथीदार दादु संजय सोनवणे रा. दरेगाव ता. मालेगाव हा दरेगाव ता. मालेगाव येथे मिळुन आला. सदर पथकाने तिन्ही आरोपींना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातील मोटार सायकली बाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता आरोपी भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ रा. सोनगाव ता मालेगाव हा व त्याचा साथीदार आकाश गोविंद गायकवाड रा.जळगाव फाटा निफाड जि.नाशिक व दादु संजय सोनवणे रा.दरेगाव ता.मालेगाव जि.नाशिक यांनी चाळीसगाव शहर व तालुका भागातुन चोरी केलेल्या तीन दुचाकी काढून दिल्या.
सदर दुचाकी चोरीबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दोन व मेहुणबारे पोलीस स्टेशनला एक असे तीन गुन्हे दाखल असल्याने सदर आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापर केलेले दुचाकी देखील काढून दिल्याने आरोपी यांनी चोरी केलेल्या सुमोर रु. २,४५,०००/- रु किमतीच्या ०४ दुचाकी पुढील कार्यवाही करीता चाळीसागव शहर पो.स्टे. च्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. सदर आरोपी भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ याच्यावर जळगाव, नाशिक, धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी दरोडा, जबरी चोरी, चोरीचे १३ गुन्हे दाखल आहेत.
यांच्या पथकाने केली कारवाई
सदरची कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता नेरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पो.हवा. मुरलीधर धनगर, पो.ना.महेश पाटील, पो.कॉ.भुषण शेलार, पो.कॉ.सागर पाटील, पो.कॉ.मिलींद जाधव, चालक पो.हवा.दिपक चौधरी,भारत पाटील यांच्या पथकाने केली.