Breaking
गुन्हेगारीछत्रपती संभाजीनगरजळगावधुळेनंदुरबारनाशिकमहाराष्ट्र

रांजणगाव फाट्याजवळ रस्तालुटीचा प्रयत्न फसला.

0 7 6 1 2 5

उपसंपादक – कल्पेश महाले 

चाळीसगांव – धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रांजणगाव फाट्याजवळ रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न प्रवासी व पोलीसांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी ठरला. शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास या मार्गावरून जाणाऱ्या क्रुझर वाहनासह चाळीसगाव येथील उद्योजक राज पुन्शी यांच्या वाहनावर दगडफेक करून लटीचा प्रयत्न झाला. मात्र वाहनधारकांनी सतर्कता राखत पोलीसांना तात्काळ कळवल्याने ही घटना टळली. दरम्यान या घटनेनंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी गस्तीदरम्यान धारदार चाकू घेऊन फिरणाऱ्या रांजणगाव येथील २३ वर्षीय तरूणाला पकडले. रात्री एक क्रुझर चाळीसगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना शहरालगतधुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रांजणगाव फाट्याजवळ दोन तरुण अपघात झाल्याचा बनाव करून रस्त्यावर दुचाकी आडवी लावून ते रस्त्यावर आडवे पडले. क्रुझरमधील प्रवाशांना अपघात झाल्याचे वाटल्याने ते थांबले असता त्यातील एकाने रस्त्यावरून उठून क्रुझरची चावी काढत वाहनधारकाला लुटण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान चाळीसगाव येथील उद्योजक राज पुन्शी हे आपल्या मित्रांसमवेत कन्नडकडून चाळीसगावकडे एम.एच.१९ ई.जी. ७२७७ या वाहनातून येत होते. यावेळी त्यांचेही वाहन थांबवण्याचा प्रयत्न या लुटारूंनी केला व वाहनावर दगडफेक करुन त्यांच्या वाहनाची काच फोडली. पुन्शी यांनी पुढे जाऊन सर्व घडलेला प्रकार महामार्ग पोलीस व चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना तात्काळ कळविला असता ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार व सहकारी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली. मात्र अंधाराचा फायदा घेऊन लुटमार करणारे पळून गेले.

रांजणगाव येथील एक तरुण पोलीसांच्या ताब्यात

दरम्यान यानंतर लागलीच रात्री चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहा.पो. उपनि. संजय गायकवाड, हवालदार नितीन सोनवणे व ज्ञानेश्वर वाघ रात्रगस्त घालत असताना पहाटे १२.५० वाजेच्या सुमारास रांजणगाव फाट्याजवळ एक इसम हातात चाकू घेवून अंधारात फिरतांना दिसला. पोलीस त्याच्याजवळ जाताच त्याने पोलीसांना पाहून पळ काढला. तेव्हा हवालदार नितीन सोनवणे व ज्ञानेश्वर वाघ यांनी पाठलाग करून त्यास पकडले. पोलीसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रकाश लक्ष्मण पाटील, वय – २३, रा.रांजणगाव असल्याचे सांगितले. त्याच्या हातात काळी मुठ असलेला स्टिलच्या पात्याचा चाकू मिळून आला. त्याबाबत त्याने समाधानकारक काहीएक माहिती दिली नाही. त्यामुळे तो चोरी अथवा अपराध करण्याच्या उद्देशाने या परिसरात फिरत असावा. अशी पोलीसांना खात्री झाल्याने ग्रामीण पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

कन्नडकडून चाळीसगावकडे मी परतत असताना तेव्हा अचानक रांजणगाव फाट्यावर हा प्रकार समोर आला. लुटारूंनी दगडफेक करून अडवण्याचा प्रयत्न केला. सावधानता बाळगत पोलीसांना तात्काळ कळविले. महामार्ग पोलीस व ग्रामीण पोलीसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी.   – राज पुन्शी, उद्योजक चाळीसगांव 

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 1 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे