जळगावधुळेनंदुरबारनाशिकमहाराष्ट्र
रमजान ईद निमित्त विजयभाऊ चौधरी जनसेवा प्रतिष्ठान तर्फे प्रभाग क्रमांक ४ व १४ मधील मुस्लिम बांधवांना साखर वाटप.

0
7
5
0
2
3
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – रमजान ईद ही मुस्लिमांसाठी एक मोठा धार्मिक सण आहे, जो रमजान महिन्याच्या शेवटी उपवास सोडल्यानंतर साजरा केला जातो. या दिवशी मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करतात, ईदगाह किंवा मशिदीत नमाज पठण करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात.
या पवित्र रमजान महिन्यात ईद च्या पूर्व संध्येला चाळीसगांव शहरातील प्रभाग क्रमांक ४ व १४ मधील मुस्लिम कुटुंबांना रमजान ईद च्या शुभेच्छा देवून विजयभाऊ चौधरी जनसेवा प्रतिष्ठान चाळीसगाव यांच्या वतीने रमजान ईद निमित्त ७०० कुटुंबांना प्रत्यक्ष घरी जावून साखर वाटप करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजयभाऊ चौधरी, आधारभाऊ चौधरी, रवी केदार, मुन्ना शाह, महम्मदभाई, पवन चौधरी यावेळी उपस्थित केले.
0
7
5
0
2
3