निर्भय महाराष्ट्र पार्टीची जळगांव जिल्ह्यातील कार्यकारिणी जाहीर.

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील विविध पदांच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृहात करण्यात आले होते. पक्षाच्या ध्येय-धोरणांची माहिती देत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पक्षाचे उपाध्यक्ष तुषार निकम यांनी पक्षाची ध्येयधोरणे समजावून सांगितली. सत्य, न्याय, निष्ठा आणि चिकाटीच्या जोरावर भ्रष्टाचारमुक्त प्रशासन प्रस्थापित करणे आणि “जनताच मालक” या विचारावर पक्षाची बांधणी झाली आहे. संस्थापक जितेंद्र भावे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा पक्ष महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवला आहे आणि म्हणूनच लोक मोठ्या प्रमाणावर पक्षात सहभागी होत आहेत. या कार्यकारिणी निवडीदरम्यान कार्यकर्त्यांना कलम 353 च्या गुन्ह्यांपासून कसे सुरक्षित राहता येईल, तसेच कोणत्या पद्धतीने काम करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पक्षाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.
नवीन कार्यकारिणी जळगाव जिल्हा व तालुका स्तरावर घोषित करण्यात आली. आझाद पवार जळगाव जिल्हा युवाध्यक्ष, अॅड.पराग पाटील जळगाव जिल्हा संघटक, संतोष लखीचंद गौड भुसावळ तालुकाध्यक्ष, राहुल गुणवंत पाटील कन्नड तालुकाध्यक्ष, विजय शर्मा चाळीसगाव तालुकाध्यक्ष, मालन जाधव चाळीसगाव महिला तालुकाध्यक्ष, सुनील हिरे चाळीसगाव तालुका सचिव, पवन असलेकर चाळीसगाव तालुका उपाध्यक्ष, पंकज रावते चाळीसगाव तालुका संघटक, समीर खाटीक चाळीसगाव तालुका कोषाध्यक्ष, निलेश मोरे चाळीसगाव तालुका सहसचिव तसेच पारोळा येथून आलेले सुभाष पवार यांनी मी पार्टीचा सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करेल असे सांगितले. या निवडीची घोषणा निर्भय महाराष्ट्र पक्षाचे उपाध्यक्ष तुषार निकम यांच्या हस्ते करण्यात आली. सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी मेहनत करण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षाची घोडदौड अधिक वेगाने सुरू ठेवण्यासाठी सर्व कार्यकर्ते कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले.
तुषार निकम यांनी चाळीसगाव तालुक्यात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या समस्या सोडविल्या आहेत. यामध्ये खराब रस्त्यांची दुरवस्था, विजेचे खांब रस्त्याच्या मधोमध उभे राहणे, आरोग्यविषयक समस्या आणि अन्य नागरी प्रश्न यांचा समावेश आहे. यातून कार्यकर्त्यांनी आणि नव्या पदाधिकाऱ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि समाजहितासाठी तत्पर राहावे, असेही यावेळी सांगण्यात आले. निर्भय महाराष्ट्र पार्टी भ्रष्टाचार, अन्याय, सरकारी कामातील दिरंगाई, प्रशासनातील अनास्था याविरोधात लढा देत असून, लोकशाहीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचा आवाज बुलंद करत आहे. पक्षाचे संस्थापक माननीय जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वात अनेक महत्त्वाचे प्रश्न उचलण्यात आले आहेत, ज्यामध्ये खाजगी फायनान्स कंपन्यांचा छळ, खराब रस्त्यांची दुरवस्था, आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचार, वीजबिलातील अन्यायकारक आकारणी यांसारख्या विषयांचा समावेश आहे. या नव्या कार्यकारिणीच्या नियुक्तीनंतर जळगाव जिल्ह्यात पक्षाचा प्रभाव वाढेल, असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.