Breaking
जळगावधुळेनंदुरबारनाशिकमहाराष्ट्र

चाळीसगांव येथे तालुकास्तरीय रिपाई आठवले पक्षाची बैठक नुकतीच संपन्न.

0 7 5 0 2 3

उपसंपादक – कल्पेश महाले 

चाळीसगांव – शहरातील सिंधी मंगल कार्यालय येथे आज ३१ मार्च २०२५ रोजी रिपाई आठवले पक्षाची महत्व पूर्ण बैठक घेण्यात अली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष रमेशजी मकासरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपाई आठवले जळगांव पश्चिम चे जिल्हाध्यक्ष आनंद खरात उपस्थित होते. दि. ८ एप्रिल रोजी जळगांव येथे रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थीतीत होणाऱ्या मेळावा यशस्वी करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर बैठकीत तालुकाध्यक्ष कैलास सूर्यवंशी, युवा तालुकाध्यक्ष छोटू बागुल, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष खैरनार, युवक जिल्हा कार्याध्यक्ष धर्मजीत खरात, युवक तालुका कार्याध्यक्ष अविनाश पटावकर, शहर अध्यक्ष नितीन जवराळे, शहर कार्याध्यक्ष किशोर मोरे यांच्यासह विजय शिरसाठ, नितीन मोरे, कैलास निकम, बसराज राठोड, सोमनाथ ठाकरे, शिवचंद्र निकम, भाईदास निकम, राहुल सोनवणे, मुकेश बागुल, दिलीप बोरसे, भास्कर जगताप, धनराज निकाळे, विकास त्रिभुवन, जगन चव्हाण, सुखलाल सोनवणे, तुकाराम खरात, कल्पेश निकम, गौतम खरात, विजय मरसाळे, विशाल अंभोरे, जगदीश अहिरे, विशाल मोर, बळीराम मोरे, सागर सोनवणे, सोयम जाधव, भूषण मोरे, योगेश चव्हाण, अभिजित चव्हाण, नवल मोरे, विकास अहिरे, अर्जुन वाघ, विजय मोरे, गौतम वानखेडे, शांताराम निकम, भीमराव निकाळे, गोपाळ शिंदे, आदित्य रणधीर, अनिरुद्ध सरोदे, प्रवीण चव्हाण, किरण चव्हाण, संदीप सोनवणे, जितेंद्र खरात, सुनंद खरात, नाना सुतार, राजू सुरवाडकर, विकास रणधीर, अनिल जाधव, नितीन निकम, मुरलीधर भवरे, सोमनाथ देसले, तुळशीराम कोळी, बापू भिल्ल, राजू अब्बास शेख, सावळीराम जगताप, मेहमूद शेख, भगवान भवरे, चंदन जाधव, शांताराम जगताप, इस्राईल पठाण, निंबा जगताप यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे