
उपसंपादक – कल्पेश महाले
जळगावात घरझडतीत घबाड सापडल्यानंतर चौकशी, दोन जिल्ह्यांचा पदभार
धुळे – शिरपूर येथील व्यक्तीकडून ८ हजारांची लाच पंटर मार्फत मागणी करणारे औषध निरीक्षक किशोर देशमुख याचा प्रशिक्षणार्थी कालावधी सुरू आहे. या काळात त्याने तब्बल ५० लाखांची माया जमवली. त्यामुळे त्याच्यावर खात्यांतर्गत कारवाई होणार आहे.
पशुपक्षी फर्मचे स्थळ परीक्षण व इतर नोंदीसाठी पंटर तुषार जैन मार्फत औषध निरीक्षक किशोर देशमुखने लाच मागितली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यांच्यावर कारवाई केली.
तुषार जैनची भूमिका काय
देशमुखसाठी लाच घेणारा तुषार जैन औषध विक्रेता आहे. त्यामुळे या व्यावसायिकांच्या व्यथा त्याला माहिती असू शकतात. त्यानंतरही तो विक्रेत्यांच्याबाजूने नव्हे तर विरोधात शिवाय बेकायदेशीर काम करत होता.
कारवाईनंतर किशोर देशमुख याच्या जळगावच्या येथील मोरया हाइट्स जवळ असलेल्या द्रौपदी नगरातील घराची झडती घेण्यात आली. या झडतीत सुमारे ५० लाखांचा ऐवज जप्त झाला. हा सर्व ऐवज शासन जमा झाला. त्याचा हिशेब देशमुख याला द्यावा लागेल. विशेष म्हणजे देशमुख अद्यापही प्रशिक्षणार्थी आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये औषध निरीक्षक म्हणून त्याची नियुक्ती झाली होती. शिवाय विभागाच्या नियमानुसार तीन वर्षांचा काळ हा प्रशिक्षणार्थी म्हणून गणला जातो. नियमाप्रमाणे देशमुखला नोव्हेंबर २०२४ मध्ये तीन वर्षे पूर्ण झाले. पण काही कारणास्तव त्याचा प्रशिक्षण कालावधी वाढवला होता. याच काळात त्याच्याकडे धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्याचा पदभार होता. देशमुख याच्या घरातून जप्त केलेला ऐवज प्रशिक्षण काळातील असल्याची माहिती देण्यात आली.
शासनाचा भरमसाठ पगार असताना सुद्धा नागरिकांच्या कामांसाठी लाचेची मागणी करुन त्रास देणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारींना शासकीय सेवेमधून कायमस्वरूपी निलंबीत करावे. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या धडक कारवाईमुळे धुळे एसीबी विभागाचे सर्व परिसरामधून कौतुक होत आहे.