
उपसंपादक – कल्पेश महाले
भडगांव – तालुक्यातील गिरड ते भातखंडे बु. रस्त्यावर गिरड गावाजवळ, पेट्रोल पंपाच्या अलीकडे, गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे एक डंपर गिरड येथे अवैध वाळू वाहतूक करताना डी.वाय.एस.पी.चाळीसगांव श्री.राजेशसिंह चंदेल यांच्या पथकाने पकडले असून ते डंपर नंबर एम.एच. २१ बी.एच. २२४७ हे भडगाव पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले असून १)चालक जुम्मा अहमद पिंजारी, वय ३९, रा. अंतुर्ली ता. पाचोरा, २)डंपर मालक ज्ञानेश्वर विनोद भोई, वय २२, रा. आठवडे बाजार, पाचोरा यांच्यावर भडगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. ९४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३(२),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून १० लाख रुपये किंमतीचे अशोक लेलँड कंपनीचे १० टायर पांढऱ्या व सिल्वर रंगाचे १ डंपर व १६ हजार रुपये किंमतीची ४ ब्रास वाळू एकूण १० लाख १६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरील कारवाई चाळीसगांव डी.वाय.एस.पी. राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बडगुजर, संभाजी पाटील, सुधीर महाजन, रवी पाटील यांच्या पथकाने केली असून पुढील तपास भडगांव पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. कुंदन राजपूत, पो.ना मनोहर पाटील, पो.हे.कॉ.विजय जाधव हे करीत आहेत.
मात्र या घटनेबाबत गुन्हा दाखल झाल्यामुळे गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणानले असून गिरणा नदीचे वस्त्रहरण रोखण्यासाठी महसूल प्रशासनासोबतच पोलीस प्रशासनानेही भडगांव तालुक्यासाठी न्याय देण्यासाठी सरसावलेले पाऊल दिसत आहे.
परंतु चाळीसगांव महसूल प्रशासन व चाळीसगांव डी.वाय.एस.पी. पथक हे चाळीसगांव शहरात व ग्रामीण भागांत अवैध वाळू उपसा व अवैध वाळू वाहतुकीबाबत कठोर कारवाई कधी करतील..? याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे.