चाळीसगांव येथे छत्रपती शाहू महाराज मराठा समाज परिवर्तन मंडळा तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – छत्रपती शाहू महाराज मराठा समाज परिवर्तन मंडळ, शहर व तालुका व शाहू मराठा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने काल बुधवार दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी जनसेवा पतपेढी च्या हाॅल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने सकाळी १२:०० वाजता छोटेखानी प्रतिमा पुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तरी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री शाहू महाराज मराठा समाज मंडळाचे माजी संस्थापक अध्यक्ष दादासाहेब डी.एस. मराठे यांनी भुषविले तर प्रमुख अतिथी म्हणून गुलाबराव गायके, सुभाषराव पवार, गोकुळ कोल्हे, अशोकराव कोल्हे, सिमा माळदकर हे होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करून महाराजांना मानवंदना देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सविस्तर प्रास्ताविक प्रशांत गायकवाड यांनी केले.तर आण्णासाहेब धुमाळ यांनी या ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यामागचा उद्देश काय आहे, यासंदर्भात योग्य ते विवेचन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डी.एस.मराठे यांनी शाहू महाराज मंडळाच्या स्थापने पासून त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात मंडळाच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याचा संपूर्ण लेखाजोखा मांडला, यावेळी उपस्थित असलेले गुलाबराव गायके, अशोकराव कोल्हे खडकी, निवृत्ती एरंडे खरजई, राजेंद्र जाधव तांबोळे, हिरामण शिंदे तरवाडे, यांनी सामाजिक विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी गुलाबराव गायके, अशोकराव कोल्हे, दगाजी गुंजाळ, गोकुळराव कोल्हे, हिरामण शिंदे, सुखदेव निकुंभ, सुभाष पवार, अशोक जगताप, निवृत्ती एरंडे, संतोष करहाळे, प्रविण गुंजाळ, फकिरा जाधव, प्रभाकर थोरात, उत्तमराव शिंगटे, अरूण गायकवाड, रमेश गोल्हार, सुरेश जाधव, राजेंद्र जाधव, सुधीर निकुंभ, मांडोळे दादा यांच्यासह इतर समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आण्णासाहेब धुमाळ तर आभार प्रदर्शन प्रविण गुंजाळ यांनी केले.