तीन हजार रुपयांची लाच स्वीकारतांना तलाठीला जळगाव एसीबीने रंगेहात पकडले.
उपसंपादक – कल्पेश महाले
जळगांव – जळगांव शहरात राहणाऱ्या २६ वर्षीय पुरुष तक्रारदार यांचे आई व भावाचे नाव ७/१२ उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टर वर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. त्याबाबत तलाठी नितीन शेषराव भोई, वय ३१ वर्षे, नेमणूक कुसुंबा जि.जळगांव याने ५०००)- रुपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी ७/०१/२०२५ रोजी समक्ष जाऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव यांना तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता पडताळणी आणि कारवाई दरम्यान तलाठी यांनी ७/१२ उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टर वर नाव लावण्यासाठी प्रथम ५०००/- , ४०००/- रुपये व तडजोडअंती ३०००/- रुपयाची लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर तलाठी नितीन भोई यांना दि.७/०१/२०२५ रोजी ३०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यावर एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
सदरची कारवाई योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि जळगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ. अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.