बॅंडने वाजत गाजत गुरुजनांची गाडीवर मिरवणुक; शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी केला नाचुन आनंद व्यक्त
कार्यकारी संपादक – संजय महाजन
वाडे येथे दहावीचे माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याला ३८ वर्षांनी आले एकञ.
वाडे ता.भडगाव — चाळीसगाव येथील रा.स. शि. प्र. मंडळ संचलीत वाडे येथील माध्यमिक विदयालयातील सन १९८५, १९८६ या वर्षांच्या दहावीच्या बॅचच्या विदयार्थ्यांनी दहावीचे शिक्षण घेऊन शाळेतुन बाहेर पडलेल्या माजी विदयार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजीत करण्यात आला होता. आपण बालपणी शिक्षण घेतलेल्या वाडे येथील माध्यमिक विदयालयात हा कार्यक्रम उत्कृष्ट मांडणी केलेल्या मंडपात गुरुजनांचा सन्मान केला. व माजी विदयार्थी, विदयार्थींनींनी आपला परीचय देत बालपणीच्या शाळेतील गमती, जमती, केलेला खोडसाळपणा, शिक्षकांनी शिक्षणाचे पाजलेले ज्ञानरुपी अमृत, शिक्षकांनी केलेली शिक्षा यासह शालेय जीवनातील आलेले प्रसंग मांडुन बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. या स्नेह मेळाव्यानिमित्त तब्बल ३८ वर्षानंतर गुरुजनांच्या उपस्थितीत पुन्हा एकञ येत शाळा भरल्याचा आनंद दिसुन आला.
विशेष म्हणजे सकाळी ९ वाजता गुरुजनांना फेटे बांधुन सजविलेल्या गाडीवरुन चाळीसगाव येथील आनंद बॅंडच्या सुमधुर गितांच्या ताला सुरात गावातुन गुरुजनांसह माजी विदयार्थी, विदयार्थीनींची वाजत गाजत भव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत या माजी विदयार्थी अन विदयार्थ्यांनी आनंद बॅंडच्या सुमधुर धुमधडाक्यात नाचुन मनमुराद आनंद घेतला. असा हा गुरुजन अन दहावीच्या माजी विदयार्थ्यांचे अनोखे स्नेह संमेलन गावात खास आकर्षण ठरल्याचे दिसुन आले.
वाडे विदयालयात आकर्षक अन उत्कृष्ट मांडणी केलेल्या मंडपरुपी वर्गातच हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक एस. एस. पाटील हे होते. सुरुवातीस सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन गुरुजनांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित गुरुजन व गावातील मान्यवरांचा सत्कार माजी विदयार्थी, विदयार्थींनींच्या हस्ते करण्यात आला. गुरुजनांना सन्मानपञ फ्रेम, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर रा. स. शि. प्र. मंडळाचे माजी संचालक डाॅ. कर्तारसिंग परदेशी, एस. एस. पाटील, एल. टी. चव्हाण, एस. के. निकम, एस. बी. मोरे, एस. आर. माळी, बी. बी. जाधव, एस. जी. अहिरे, परमेश्वर टीळकर, पी. के. मोरे, ओंकारदास बैरागी, शिवाजी पाटील आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुञसंचलन गसचे माजी संचालक सुनिल निंबा पाटील व सुनिल भाऊराव माळी यांनी केले. प्रास्तविक कैलास माळी यांनी केले. यावेळी मुकुंदा माळी, सुरेखा पाटील, विदया पाटील, भटाबाई माळी, सरलाबाई परदेशी, अशोक परदेशी,चंद्रकांत मोरे, शरद महाजन, सुनिल पाटील, शामकांत बोरसे, चंद्रकांत अमृतकार, रविंद्र पाटील, नाना मरसाळे, राजु परदेशी, हरीचंद्र माळी, राजु माळी, अर्चना पाटील, महम्मद खाटीक यांचेसह विदयार्थी, विदयार्थीनींनी आपल्या शाळेतील बालपणीच्या आठवणी मनोगतातुन मांडुन गुरुजनांचे आभार मानले. तसेच यावेळी एल. टी. चव्हाण, एस. के. निकम, एस. जी. अहिरे, एस. आर. माळी, बी. बी. जाधव आदि शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय मनोगतातुन शिक्षक एस. एस. पाटील यांनी विनोदी शैलीतुन अन अलंकारीक रुपाने शब्दांची गुंफन करीत बालपणीच्या विदयार्थी, विदयार्थींनी अन गुरुजनांच्या नात्याची मांडणी केली. आपले जीवन सुखी व आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा दिल्या. विदयार्थ्यांनी व्यसनांपासुन दुर राहावे. असेही एस, एस. पाटील यांनी सांगीतले. यावेळी एकच हास्याचे फवारे उडाल्याचे चिञ पहावयास मिळाले.
याप्रसंगी वाडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच गुलाब पाटील, माजी उपसरपंच प्रदिप भिल्ल, सदस्य रविंद्र सोनवणे, विकासोचे चेअरमन विजय परदेशी, प्रथम महिला उपसरपंच ऊषाबाई परदेशी, मी वाडेकर गृपचे जगतसिंग राजपुत यांचेसह नागरीकांचीही उपस्थिती होती. आभार सुनिल भाऊराव पाटील यांनी मानले. तसेच कार्यक्रमानंतर गावापासुन जवळच असलेल्या राजेंद्र हरी पाटील यांच्या शेतात निसर्गरम्य वातावरणात स्नेह भोजनाचा आनंद गुरुजनांसोबतच माजी विदयार्थी, विदयार्थीनी, नागरीकांनी घेतला.कार्यक्रम यशस्विततेसाठी सर्व वर्ग मिञ, मैञिणींनी अनमोल परीश्रम घेतले.