कजगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले
कार्यकारी संपादक – संजय महाजन
कजगाव – स्त्री शिक्षणाच्या पुरस्करत्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती सावता माळी चौक, कजगाव येथे साजरी करण्यात आली. थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फुले दाम्पत्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच रघुनाथ महाजन, चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष नाना मोरे, माजी उपसरपंच भानुदास महाजन, पुंडलिक सोनवणे, माजी ग्रामपंचायत सदस्य आबा महाजन, अनिल टेलर, अनिल महाजन, कैलास महाजन, फकिरा मिस्तरी, नबु मलिक, संजय महाजन, विकास महाजन, भाऊसाहेब वाघ, पांडुरंग महाजन, भिकन महाजन, भैय्या महाजन, चेतन महाजन, रावसाहेब महाजन, रघुनाथ पवार, सुनील महाजन, रघुनाथ जाधव, जयराम महाजन, मोहन महाजन, अण्णा महाजन, बाळू महाजन, रघुनाथ देसले, आरिफ मलिक, शिवप्रसाद महाजन, दादा महाजन व असंख्य ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.