शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या सातत्यपूर्ण लढ्याला यश.
उपसंपादक – कल्पेश महाले
महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेरस्त्यांच्या प्रश्नांवर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर केलेल्या पेरू वाटप आंदोलनानंतर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सन्माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसादजी यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या असता त्यांनी आचारसंहिता संपताच डिसेंबर मध्ये जळगाव जिल्ह्यात महाराजस्व अभियान राबवण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करून सुरू दिलेला शब्द पाळला जळगावकरांना न्याय देण्यासाठी सार्थ ठरणार – महाराष्ट्र राज्य शिव पानंद चळवळीचे शरद पवळे, दादासाहेब जंगले पाटील
जळगाव – जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवपानंद शेतरस्ते चळवळीच्या वतीने पेरू वाटप आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी सन्माननीय जिल्हाधिकारीआयुष प्रसाद यांना शेतरस्ते खुले करण्यासाठी जाहीर निवेदन देवून चर्चा करत पेरू देत शेतकऱ्यांच्या पेरू आंदोलनाकडे लक्ष वेधन्यात आले होते तालुक्यातील सर्व वहिवाटीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्याच्या नोंदी गाव नकाशावर घेण्यात याव्यात,वाटपपत्रात शेतरस्ता सक्तीचा करावा,शासन निर्णयाप्रमाणे मोजणी शुल्क व पोलीस संरक्षण फी बंदची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी,शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्दीसाठी नंबरी लावुन त्यांचे नियोजित सर्वेक्षण करून नंबरी हटवणार यांना दंड सुरू करा ,शेतरस्त्याअभावी पडीक राहणाऱ्या शेत जमीन धारकांना विना अट नुकसान भरपाई देण्यात यावी त्याचबरोबर शिव रस्ते अतिक्रमण असल्यामुळे वाहतुकीयोग्य नसल्याने शेतकऱ्यांना शेतीमध्ये वखरणी पेरणी मशागत व पेरणी कापणी उत्पादित पिक वाहतूक यासाठी यंत्रसामुग्री ट्रॅक्टर ट्रक ऊसाची ट्रक बैलगाडी टेम्पो इत्यादी साधने शेतात नेणे आणणे अवघड होत चालले आहे शेतकऱ्यांनी यापूर्वी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांकडे शेतरस्त्यासाठी विनंती अर्ज दाखल केलेले आहेत परंतु तहसीलदार कोणत्या प्रकारची निर्णय देत नाहीत महसूल अधिनियम 1966 च्या 143 कलम नुसार तहसीलदारांनी रस्ता उपलब्ध करून देणे आवश्यक आहे परंतु तरीही संबंधित तालुक्यांच्या तहसीलदार शिवपानंद शेत रस्त्यांच्या हदद निश्चित करून शेतरस्ते खुले करत नाहीत म्हणून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मध्ये जनजागृती करत जिल्हाधिकारी कार्यालयावर ११ ऑक्टोबर रोजी पेरू वाटप आंदोलन केले होते शेत व शिवपानंद रस्त्याच्या समस्या निवारणासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विशेषतः जामनेर, भडगाव, रावेर, चाळीसगाव आदी तालुक्यातील शेतकरी या शेतरस्त्यांच्या पेरू आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते यांना दिलेला शब्द पाळत १ जानेवारी २०२५ ते १३ फेब्रुवारी २०२५ कालावधी महाराजस्व अभियान राबण्यासाठी मोहीम हाती घेत जिल्ह्यातील शेतरस्ते खुले करण्यासाठी विशेष महाराजस्व अभियान सुरू करून ऐतिहासिक निर्णय घेत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला असे महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले यावेळी जळगाव जिल्हा कृती समितीचे गणेश बाविस्कर, प्रताप धात्रक,प्रविण पाटील,सचिन चौधरी, प्रविण गोसावी,दिलीप पाटील,जगन कुमावत, भगवान पाटील, मुकेश जाधव, रामचंद्र आव्हाड, प्रकाश दौंड, राजेंद्र पाटील,समाधान पवार, शाम पाटील, पोपट पवार, विठोबा माळी, विजय माळी आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.