राष्ट्रीय ज्युनियर काँलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न.
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – शहरातील नामंकीत राष्ट्रीय ज्युनियर काँलेज चा स्नेहसंमेलनात दिमाखात साजरा झाला. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेचे संचालक आर्किटेक्ट धनंजय चव्हाण यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पुजनाने झाले. व्यासपीठावर आर्किटेक्ट धनंजय चव्हाण, प्राचार्य वाय. आर. सोनवणे, उपप्राचार्य डॉ. मनोज शितोळे, प्रा.एस.एन.सांगळे, प्रा.विद्या देशमुख, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.चारुशिला देशमुख उपस्थित होत्या. गणेश वंदनाच्या नृत्य अविष्काराने कार्यक्रमाला सुरवात झाली, विद्यार्थी व विद्यार्थीनींनी विविध नृत्य अविष्कार, गीत गायन प्रबोधन पर नाटिका, पथनाट्य, एकांकिका, शेर शायरी, चुटकुले, क्लासिकल, सोलो डान्स, समुह नृत्य, लोक नृत्य, असे रंगतदार नृत्य अविष्काराने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा.सचिन निकम व विद्यार्थींनी श्रेया गाडेकर व सिया यांनी केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.चारुशिला देशमुख, प्रा.सचिन निकम, प्रा.स्वाती देशमुख, प्रा.एस. वाय. शेख, प्रा.एम. एल. चव्हाण, प्रा.सौ.विशाखा निकम यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रम यशस्वीते साठी प्रा.सचिन निकम प्रा.मनोज देशमुख, प्रा.पंकज तुपे, प्रा.किरण पाटील, प्रा.तुषार चव्हाण यांनी काम पाहिले विद्यार्थीना शिस्तचे काम प्रा.किरण वाबळे, प्रा.निलेश गाढवे, प्रा.भूषण चव्हाण, प्रा.प्रदीप साळुंखे, प्रा.संदीप चौधरी, प्रा.समाधान निकम, प्रा.शरदराव शेळके, श्री.अभय सूर्यवंशी यांनी केले तसेच सर्व प्राध्यापक बंधु भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी विविध गुणदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. शेवटी ऊपप्राचार्य डॉ. मनोज शितोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.