चुलत दिरासोबत पत्नीचे प्रेमाचे सूत जुळले; दोघांनी मिळून पतीला ठार केले

चुलत दिरासोबत पत्नीचे प्रेमाचे सूत जुळले; दोघांनी मिळून पतीला ठार केले.
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव:- दिनांक १९ जून २०१४ रोजी तुषार अनिल देसले रा.कोदगांव, ता.चाळीसगाव यांनी खबर दिली कि, रात्री १०:४५ वाजेच्या पुर्वी कुणाल बुददेलखंडी यांचे शेताजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर चाळीसगांव जि. जळगांव येथे इसम नामे बाळु सिताराम पवार, रा.गवळीवाडा, न्यायडोगंरी, ता.नादंगाव, जि.नाशिक यास कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यास दुखापत होवुन तो मयत झाला असावा वगैरे मजकुराची खबर वरुन चाळीसगांव शहर पो.स्टे. अकस्मात मृत्यु रजि. नं. ६१/२०२३ सी. आर. पी. सी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आली होती.
मा. पोलीस अधीक्षक जळगांव सो श्री महेश्वर रेडडी, मा.अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगांव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर, मा.सहाय्यक पोलीस अधीक्षक चाळीसगांव उपविभाग श्री.अभयसिंह देशमुख यांनी अप.मृत्यूच्या तपासाबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या सदर सूचनाप्रमाणे घटनास्थळाची परिस्थिती व मयताचे अंगावरील जखमा यावरून मयताचा घातपात करुन खून केला असावा असे दिसून आले. त्यावरुन मयताचे नातेवाईकांची विचारपूस केल्यावर मयताची पत्नी सौ.वंदना पवार हिचेकडे फोनवरुन चौकशी करता तिचेवर संशय आल्याने पोलीस निरीक्षक श्री.संदीप पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सागर ढिकले, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री.सुहास आव्हाड, श्री.संदीप घुले व पथकाला तिचा शोध घेणेकामी कळविले. त्याप्रमाणे वंदना पवार हिचा तात्काळ शोध घेऊन तिला पळून जाण्याची संधी न देता चाळीसगांव रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. त्यांनतर तिचेकडे कौशल्याने तपास केला असता, तिने गुन्ह्याबाबत खरी हकिकत सांगितली. वंदना पवार हिस पती बाळु पवार हा नियमीत दारु पिवुन शिवीगाळ व मारहाण करीत असे, त्यामुळे ती त्याच्या त्रासाला कंटाळलेली होती. तसेच तिचे व तिचा चुलत दिर गजानन राजेंद्र पवार रा. न्यायडोंगरी ता. नांदगांव जि. नाशिक याच्याशी मागील दोन वर्षापासून प्रेम संबंध जुळले होते. आपल्या प्रेमसंबधाबाबत पती बाळू पवार यास समजल्यावर तो अडथळा निर्माण करेल म्हणून वंदना पवार हिने दिर गजानन पवार याचे सोबत पती बाळू पवार यास जिवे ठार मारण्याचा चार ते पाच महिन्यापासून कट रचला होता.
त्याप्रमाणे दिनांक १८ जून २०२४ रोजी वंदना पवार व तिचा पती असे चाळीसगांव येथे येणार होते बाबत तिने अगोदरच तिचा दिर गजानन पवार यास माहिती देऊन, चाळीसगांव रेल्वे स्टेशनला बोलावुन घेतले, त्यानंतर वंदना व गजानन यांनी गजाननच्या मोटारसायकलने मयत बाळू पवार यास ठरल्याप्रमाणे हॉटेलमध्ये नेवुन, त्यास जास्त प्रमाणात दारु पाजली व त्याठिकाणी जेवन केले. अंधार झाल्यावर अंधाराचा फायदा घेवुन, वंदना हिने तिच्या पतीस मला माझ्या माहेरी कन्नड येथे जायचे आहे असे सांगुन, तिचा दिर गजानन राजेंद्र पवार याच्या मोटारसायकलवर मयत बाळू पवार यास बसवून घटनास्थळापर्यंन्त घेवुन गेले. घटनास्थळावर रोडच्या बाजूला मयत बाळू पवार हा जास्त दारु नशेत असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन त्याची पत्नी वंदना बाळू पवार व तिचा दिर गजानन पवार यांच्यात ठरल्याप्रमाणे त्यांनी मयताचे पोटावर ब्लेडने वार करुन, दोन वेळा डोक्यात मोठा दगड टाकून गंभीर जखमी करुन, त्यास जिवे ठार मारले व त्यांच्यावर कोणीही संशय घेवु नये म्हणुन बाळु पवार याचा अपघात झाला आहे असे दाखविण्यासाठी, त्याचे प्रेत ओढत नेवुन महामार्गावर टाकुन दिले. तसेच त्याची ओळख पटावी म्हणुन सॅगमध्ये ठेवलेले त्याचे आधारकार्ड काढुन, त्याच्या शर्टाच्या खिश्यात ठेवले. आपल्याला कोणी पाहीले नाही हे पाहून ते दोघे तेथून पसार झाले होते. पोलीसांनी कौशल्याने सदर कट उघडकीस आणून मयताची पत्नी वंदना पवार व तिचा चुलत दिर गजानन पवार यांना पळून जाण्याची संधी न देता, वंदना हिस चाळीसगांव रेल्वे स्टेशन परिसरातुन व गजानन पवार यास न्यायडोंगरी येथुन ताब्यात घेतले. वंदना व गजानन यांनी बाळू पवार याचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी सरकारतर्फें फिर्यादी होऊन चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. २६६/२०२४ भादवि. कलम ३०२, २०१, १२० (ब), ३४ प्रमाणे त्यांचे विरुध्द फिर्याद देउन, गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आलेली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक जळगांव श्री.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव परिमंडळ, श्रीमती.कविता नेरकर (पवार), सहाय्यक पोलीस अधीक्षक चाळीसगांव उपविभाग श्री.अभयसिंह देशमुख, यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली आरोपीतांनी गुन्ह्यात कोणताही पुरावा ठेवलेला नसताना चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.संदिप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सागर ढिकले, पोलीस उपनिरीक्षक श्री.सुहास आव्हाड, उपनिरीक्षक श्री.संदिप घुले, उपनिरीक्षक श्री.सुभाष पाटील, पोहेकॉ राहुल सोनवणे, योगेश बेलदार, विनोद भोई, पंढरीनाथ पवार, प्रवीण जाधव, अजय पाटील, पोना महेंद्र पाटील, भूषन पाटील, दिपक पाटील, रवींद्र पाटील, तुकाराम चव्हाण, पो.कॉ.प्रकाश पाटील, शरद पाटील, नंदकुमार महाजन, विजय पाटील, निलेश पाटील, अमोल भोसले, विनोद खैरनार, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, राकेश महाजन, गोपाल पाटील, अमोल पाटील, समाधान पाटील, पवन पाटील, मनोज चव्हाण, ज्ञानेश्वर पाटोळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ सुधाकर अंभोरे, पोना लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, पो.कॉ. ईश्वर पाटील, महेश सोमवंशी तसेच सायबर पोलीस स्टेशनचे पो.कॉ. गौरव पाटील, मिलींद जाधव तसेच फॉरेन्सीक टीमचे पो.कॉ.हरिष परदेशी, शिवराज नाईक, प्रमोद ठाकूर अशांनी उघडकीस आणला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.संदिप पाटील आणि पोहेकॉ विनोद भोई हे करीत आहेत.