
उपसंपादक – कल्पेश महाले
जळगांव – पारोळा तालुक्यातील महिला डॉक्टर यांचे नवीन पॅन कार्ड रद्द करण्यासाठी लाच मागणारे आयकर अधिकाऱ्यास व शिपायाला पुण्याच्या सीबीआय पथकाने अटक केली. आयकर विभागातील अधिकारी राकेश रंजन उमेश झा, वय ३५, रा. जळगाव व शिपाई ज्ञानेश्वर सोनवणे, वय ३८, रा.पाचोरा अशी नावे आहेत.
सविस्तर माहिती अशी की, पारोळ्यातील महिला डॉक्टर यांचे पॅन कार्ड हरवले होते. त्यामुळे त्यांनी नवीन पॅन कार्ड मिळावे म्हणून अर्ज केला होता आणि त्या अर्जानुसार त्यांना नवीन पॅन कार्ड सुद्धा मिळाले मात्र २०१८ ते २०२१ या वर्षाचा त्यांचा आयकर भरला गेला नाही महिला डॉक्टरांच्या सी.ए. याच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी तपासले जुन्या आणि नव्या पॅन कार्ड चे नंबर वेगवेगळे असल्याने आयकर भरला गेला नसल्याचे समोर आले. तेव्हा महिला डॉक्टरांनी नवीन पॅन कार्ड रद्द करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला मात्र ते रद्द झाले नाही. म्हणून डॉक्टरच्या हॉस्पिटल मधील प्रशासकीय अधिकारीने आयकर अधिकारी राकेश रंजन उमेश झा यांची भेट घेतली व त्यांनी सुचवल्याप्रमाणे महिला डॉक्टरने कागदपत्रे सादर करूनही ते पॅन कार्ड रद्द झाले नाही. हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारीने १० मार्चला आयकर कार्यालयात गेले असता आयकर अधिकारी यांनी १० हजाराची लाच मागितली ही बाब हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लागलीच डॉक्टर यांना सांगितली. तेव्हा तात्काळ डॉक्टरांनी पुण्याचे सीबीआय कडे तक्रार केली. तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले व लाचेची रक्कम शिपाई कडे देण्यास सांगितले. तडजोडी अंती ५ हजार रुपयांची लाच घेताना सीबीआयच्या पथकाने जुन्या बीजे मार्केटमधील आयकर विभागाच्या कार्यालयात आयकर अधिकाऱ्यासह एका शिपायाला सीबीआय पथकाने रंगेहात पकडले असून आयकर अधिकाऱ्याला न्यायालयीन तर शिपायाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.