आ.मंगेश चव्हाण यांचा पहिल्या टर्ममध्ये झंजावात विकासाचा; दुसऱ्या टर्म मध्ये निर्धार स्मार्ट प्रगतीचा.
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – महायुतीचे उमेदवार आ.मंगेश चव्हाण यांच्याप्रचारार्थ संवाद दौरा खेडगाव बहाळ गटातील – राजमाने, कळमडू, कुंझर , अभोणे, अभोणे तांडा, पोहरे, खेडगाव, खेडी खु., दस्केबर्डी, रहिपुरी, बहाळ रथाचे, बहाळ कसबे, टेकवाडे बु., टेकवाडे खु., ढोमणे , बोरखेडा पिराचे, न्हावे, वडाळा – वडाळी तसेच वाघळी पातोंडा गटातील – वाघळी, भामरे बु., भामरे खु., चांभार्डी बु., चांभार्डी खू., मुंदखेडा बू., मुंदखेडा खू., पातोंडा, ओझर, वाघडू, वाकडी, हातले, वाघले, जावळे, जामडी, रोकडे या गावांमधील नागरिकांनी ढोल ताशे, घोड्यावर मिरवणूक, फटाके फोडून, घराघरांसमोर अंगणात रांगोळी काढून, फुलांचा वर्षा करून मोठा जल्लोषात आ.मंगेश चव्हाण यांचे स्वागत केले.
यावेळी सर्व नागरिकांशी आ. मंगेश चव्हाण यांनी संवाद साधत अ. क्र.०२ , कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला पुन्हा एकदा निवडून देण्याची विनंती आ.मंगेश चव्हाण केली. भरघोस मतांनी विजयी करून पुन्हा मंगेश चव्हाण आमदार होतील असा विश्वास नागरिकांनी दर्शविला आहे.
चाळीसगाव तालुक्यात विकासाचा सेतू नव्याने उभारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यातून कुंझर सारख्या शेवटच्या टोकाच्या गावाचा सुद्धा विकास करता आला. वरखेडे धरणावरून 4 गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवता आला.शेतीसाठी बंदिस्त पाटचारीतून शाश्वत पाण्याचा स्त्रोत उभा करता आला.या सर्व कामांचे साक्षीदार गावकरी आहेत. त्यामुळे गावागावातून संवाद साधतांना उत्साहाचे वातावरण दिसत आहे.