Breaking
जळगावधुळेनाशिकमहाराष्ट्रराजकिय

भाजपची ९९ उमेदवारांची पहिली यादी, ८९ जणांना पुन्हा संधी : १० SC-ST, १३ महिला; ३ अपक्षांना तिकिट; फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिममधून लढणार.

0 5 3 3 9 0

(उपसंपादक – कल्पेश महाले)

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यापैकी ६ जागा एसटीसाठी आणि ४ जागा एससीसाठी आहेत. तर १३ जागांवर महिलांना तिकीट देण्यात आले आहे. १० उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिममधून, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकरमधून तर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांना भोकरदनमधून तिकीट मिळाले आहे.

तीन अपक्षांनाही तिकीट

भाजपच्या पहिल्या यादीत महेश बालदी (उरण), राजेश बकाणे (देवळी), विनोद अग्रवाल (गोंदिया) या तीन अपक्षांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या दोघांना तिकीट

मे महिन्यात लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले सुधीर मुनगंटीवार यांना बल्लारपूरमधून तर मिहीर कोटेचा यांना मुलुंडमधून तिकीट देण्यात आले आहे.

 दोन भावांना तिकीट मिळाले

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम आणि त्यांचे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिममधून उमेदवारी दिली आहे.

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर कुलाब्यातून लढणार

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कुलाब्यातून तर नितेश राणे कणकवलीतून निवडणूक लढवणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचे सदस्यत्व रद्द न केल्याने नार्वेकर विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. तर नितेश राणे मुस्लीमविरोधी वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. नांदेड लोकसभा जागेवरही २० नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. त्या जागेसाठी भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही.

4/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 3 9 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे