Breaking
जळगावमहाराष्ट्र

उबाठा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष व बंजारा नेते संजय राठोड यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह केला भाजप मध्ये प्रवेश

0 7 5 7 3 1

(उपसंपादक – कल्पेश महाले)

चाळीसगाव – गेल्या महिन्याभरापासून आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाविकास आघाडीच्या हजारो पदाधिकारी यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. आज चाळीसगाव तालुक्यात उबाठा सेनेला मोठे खिंडार पाडण्यात यश मिळाले असून उबाठा सेनेचे व्हीजेएनटी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व भारतीय बंजारा क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष संजय राठोड व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार मंगेश चव्हाण यांनी भाजपाचा रुमाल गळ्यात टाकत त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी समाजकल्याण विभागाचे माजी सभापती राजेंद्र राठोड, पंचायत समिती माजी सभापती विजय जाधव, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गोरख राठोड, कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी उपसभापती साहेबराव राठोड, संजय गांधी योजनेचे सदस्य दिनकर राठोड, इच्छापुर ग्रामपंचायत सरपंच निलेश राठोड, सांगवी सरपंच संतोष राठोड, हातगाव माजी सरपंच विलास चव्हाण, किसान मोर्चा जिल्हा पदाधिकारी योगेश जाधव, घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ता बबलू चव्हाण, तालुका कार्यकारणी सदस्य राम पाटील, जिल्हा पदाधिकारी रुपेश पाटील, यांच्यासह इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

संजय राठोड व त्यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील भाजपा मध्ये पक्षप्रवेश केलेले पदाधिकारी व कार्यकर्ते खालीलप्रमाणे

अंधारी येथील दसरथ मोहन पवार, मधुकर धर्मा चव्हाण, वसंत हंसराज चव्हाण व कार्यकर्ते, हातगाव येथील मा.सरपंच गोरख राठोड, संजय मंगू राठोड, थाणसिंग राठोड व कार्यकर्ते, विसापूर येथील हिरालाल चव्हाण, सुनील चव्हाण व कार्यकर्ते, पिंपळगाव येथील अमोल चव्हाण, अशोक चव्हाण व कार्यकर्ते, राजदेहरे येथील माजी सरपंच शिवा राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण व कार्यकर्ते, राजदेहरे गावठाण ज्ञानेश्वर राठोड, सागर राठोड व कार्यकर्ते, घोडेगाव येथील रविंद्र राठोड पंडित चव्हाण ,दादा जयसिंग राठोड, शिंदी येथील प्रकाश राठोड व कार्यकर्ते, ओढरे येथील दिनेश जाधव, निलेश राठोड व कार्यकर्ते, पाटणा येथील दिनेश पवार ,मनोज पवार, शिवापूर येथील साहेबराव गणेश चव्हाण सुरेश श्रावण घाडगे, दिनेश गणेश चव्हाण व कार्यकर्ते, लोंजे येथील सुनील राठोड व कार्यकर्ते, कोंगानगर येथील सागर चव्हाण व कार्यकर्ते, वाघले येथील गणेश राठोड, मा.सरपंच प्रशांत राठोड, भुरा राठोड व कार्यकर्ते आदी होते.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 7 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे