नगरदेवळा येथील घटना; अंगावर वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

(उपसंपादक – कल्पेश महाले)
नगरदेवळा:- पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील शेतकरी पांडुरंग त्र्यंबक महाजन (वय ६५) असे मयत शेतकरी यांचे नाव आहे. पांडुरंग महाजन हे निवृत्त शिक्षक होते. दरम्यान काल ते नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले असताना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा परिसरात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पांडुरंग महाजन हे त्यांच्या चुंचाळे शिवारातील शेतीत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. दरम्यान त्यांचा जागीच मृत्यू झालाय. याबाबतची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिलीय.
तसेच याच शिवारातील बैल व वासरू वीज कोसळल्याने जागीच ठार
तसेच नगरदेवळा परिसरात चुंचाळे शिवारात प्रकाश चिंधा महाजन यांच्या शेतातील १ बैल २ वासरे हे वीज कोसळल्याने जागीच ठार झाले आहेत. दरम्यान नगरदेवळा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे परिसरात विजेचा प्रवाह खंडीत झाला होता.