Breaking
जळगावधुळेनंदुरबारनाशिकमहाराष्ट्र

दहा लाख लाचेची केली मागणी, दोन लाख रंगेहात स्वीकारताना संस्थेच्या सचिवाला जळगाव एसीबी कडून अटक.

0 7 5 7 2 8

(उपसंपादक – कल्पेश महाले)

जळगाव:- तक्रारदार हा पिंपळकोठा खुर्द ता.एरंडोल जि.जळगाव,वय ५४, यांचा मुलगा हा वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था, पिंप्री खुर्द, ता.धरणगाव, जि.जळगाव संचलित २० टक्के शासकीय अनुदानित आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, भोद खुर्द शिवार येथे सन २०२१ पासून अनुसूचित जाती या प्रवर्गातील शिपाई रिक्त पदावर नोकरीस होता. त्यावेळी सचिव विनोद चौधरी यांनी सुमारे ७ लाख ७० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर तक्रारदार यांच्या मुलास सचिव विनोद मधुकर चौधरी यांनी तक्रारदार यांच्या मुलाचे वय २०१२ पासून फरक काढण्यासाठी कमी असल्याचे सांगून त्या शिपाई पदावरून गेल्या महिन्यात कमी केले होते.

सदरची जागा ही सन २०१२ पासून रिक्त पद दाखवून त्या जागेवर तक्रारदार यांचा भाचा राजेश या शिपाई पदावर नोकरी लावण्यासाठी शासनाकडून मंजुरी आणून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दिनांक १५/१०/२०२४ रोजी १० लाख रुपये लाच रकमेची मागणी केली होती. त्यात तात्काळ २ लाख रुपये, शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यावर ३ लाख रुपये, व पहिला पगार सुरू होईल तेव्हा ५ लाख रुपये अशी टप्प्या-टप्प्याने १० लाख रुपयाची मागणी करून यापूर्वी स्वीकारलेले सुमारे ७ लाख ७० हजार रुपये विसरून जा असं सांगितले. व सदर रकमेचा पहिला हप्ता म्हणून २ लाख लाचेची रक्कम आज दिनांक १७/१०/२०२४ रोजी सचिव विनोद मधुकर चौधरी, वय-५३, वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था, प्रिंप्री खुर्द ता.धरणगाव जि.जळगाव रा. गट नं. ५३+५४, साई आनंद अपार्टमेंट, शिव कॉलनी, जळगाव या त्यांचे राहते घरी स्वतः स्वीकारली म्हणून त्यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस स्टेशन जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मधील सापळा पर्यवेक्षक अधिकारी योगेश ठाकूर पोलीस उपअधीक्षक लाप्रवि.जळगाव, सापळा व तपास अधिकारी स्मिता नवघरे पोलीस निरीक्षक लाप्रवि. जळगाव, आणि हा सापळा यशस्वी पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पो.ना. सुनील वानखेडे, पो.कॉ. प्रणेश ठाकूर यांनी केला. या कारवाईसाठी स.फौ. सुरेश पाटील, पोहेकॉ. रवींद्र घुगे, मपोहेकॉ. शैला धनगर, पोना.बाळू मराठे, किशोर महाजन, पोकॉ. प्रदीप पोळ, राकेश दुसाने यांनी सहकार्य केले.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 7 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे