पाचोरा पोस्ट ऑफिस येथे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत दोन लाखाचा दावा मंजूर.

(कार्यकारी संपादक – संजय महाजन)
पाचोरा:- दि १६ रोजी पाचोरा पोस्ट ऑफिस येथे डाक अधीक्षक जळगाव श्री.ए.के. धनवडे यांचे हस्ते प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा अंतर्गत दोन लाख विमा रक्कम मृत अमोल बडगुजर यांची पत्नी वैशाली बडगुजर यांच्या खात्यात जमा करण्यात आली.एक वर्ष अगोदर अमोल बडगुजर यांनी पोस्ट ऑफिस पाचोरा येथे बचत खाते उघडले होते आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा ४३६ रुपये वार्षिक विमा संरक्षण घेतले होते. पण अमोल बडगुजर यांचे अकाली निधन झाले. म्हणून बचत खात्यास वारस असलेल्या त्यांचा पत्नी वैशाली बडगुजर यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत दोन लाखाचा दावा मंजूर करण्यात आला.
सदर मंजूर दाव्याची रक्कम लाभार्थीच्या बचत खाते मध्ये जमा करण्यात आली. विमा रक्कम जमा केल्यानंतर बचत खाते पासबुक वारसास देताना डाक अधीक्षक श्री.ए.के. धनवडे यांनी पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली. तसेच पोस्टात बचत खाते उघडण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमास सहाय्यक डाक अधीक्षक जगदाळे, सहाय्यक डाक अधीक्षक मस्के सहाय्यक डाक अधीक्षक चाळीसगाव महेंद्र चव्हाण उपस्थित होते.