भरधाव कंटेनरच्या धडकेत वाघळी येथील तरूण जागीच ठार.

चाळीसगाव तालुका प्रतिनिधी कल्पेश महाले
चाळीसगाव : भरधाव कंटेनरच्या जोरदार धडकेत तरूण जागीच ठार झाल्याची दु:खद घटना रात्री तालुक्यातील वाघळी गावाजवळ घडली आहे.
तालुक्यातील वाघळी येथील रोहिदास शंकर दांडगे (धनगर, वय-३९) यांना भरधाव कंटेनरने (डी.डी. ०१ एच ९४८४) जोरदार धडक दिली. यातच त्याचा जागीच मृत्यु झाला. सदर घटना जळगाव – चाळीसगाव महामार्गावरील वाघळी गावाजवळ रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सदर घटना घडताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मात्र घटना एवढी विचित्र घडली आहे की, अनेकांच्या मनावर परिणाम करणारी आहे. दरम्यान घडलेल्या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या तार्या तुटून पडल्या आहे. यामुळे वीज वितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान यावेळी झाले आहे.
मयत रोहिदास शंकर लांडगे (धनगर) यांच्या पश्चात्य सहा वर्षाचा लहान मुलगा, मुलगी, पत्नी असा परिवार आहे. दरम्यान दिवाळीच्या दिवशी झालेल्या या घटनेमुळे त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.