
उपसंपादक – कल्पेश महाले
जळगांव – शहरातील तक्रारदार यश मनोहरलाल अहुजा, वय २४ वर्ष, रा. केमीस्ट भवन जळगाव यांनी फिर्याद दिली की, दिनांक ३०/०३/२०२५ रोजी सिंधी कॉलनी सेवामंडळ जळगाव येथे मंदीरात सीबी झेड मो.सा क्र. एम.एच. १९ बीए १७३७ ही रात्री ०८.०० वा लावुन मंदीरात निघुन गेला होता. ०९.०० वाजता फिर्यादी हे मोसा लावलेल्या ठिकाणी आले असता त्यांना सदर ठिकाणी मोसा लावलेली दिसुन आली नाही. त्यांनी सदर मोसा चा शोध घेतला असता सदर मोसा ही कोठेच मिळुन न आल्याने दिनांक ३१/०३/२०२५ रोजी मोस चोरी गेल्याबाबत फिर्याद दिली असुन गुन्हा रजिस्टर नंबर २४८/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव जिल्हयामध्ये तसेच एमआयडीसी पोस्टे हद्दीत मोटार सायकल चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, यांनी चोरीच्या घटना उघडकिस आणुन आरोपी अटक करणेबाबत मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना घटनास्थळाची पाहणी करुन आरोपींचा शोध घेणेबाबत सुचन दिल्या होत्या.
त्यानुसार गुन्हे शोधपथकातील पोलीस अधिकारी पोउपनि. राहुल तायडे, चंद्रकात धनके, पोहेकाॅ. गणेश शिरसाळे, पोना.किशोर पाटील, विकास सातदीवे, योगेश बारी, पोकाॅ. किरण पाटील, नाना तायडे, राहुल घेटे, नितीन ठाकुर अशांनी सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन दोन ईसम हे सीबी झेड मोटार सायकल काढतांना दिसले. त्याप्रमाणे दोन पथके तयार करुन शोध घेण्यास सुचना दिल्या. शोध घेत असतांना शनीपेठ पोस्टे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आकाश संजय मराठे हा सदर मोसा काढतांना दिसुन आल्याने त्यास त्याचे राहते घरातुन ताब्यात घेवुन त्यास अटक करुन त्याचे सोबत असलेल्या साथीदाराबाबत विचारपुस करता त्याने त्याचे सोबत माधव श्रावण बोराडे हा असल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींना अटक केली असुन त्यांचे कडुन ८०,०००/- रुपये किंमतीची सीबी झेड मो.सा क्र. एम.एच. १९ बीए १७३७ आणी जळगाव शहर पोस्टे गुरनं. १२८/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्हयातील ६०,०००/- रुपये किंमतीची हीरो कंपनीची एचएफ डीलक्स मोसा क्र. एमएच १९ बीटी ६९४५ अशा एकुण १४०,०००/-रुपये किंमतीच्या दोन मोसा हस्तगत करण्यात आल्या आहेत.