कजगाव येथे शेतकरी शिव संवाद यात्रेचे उत्सवात स्वागत.

(कार्यकारी संपादक – संजय महाजन)
कजगाव:- पाचोरा-भडगाव मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या माध्यमातून नऊ सप्टेंबर पासून शेतकरी शिव संवाद यात्रेला मतदारसंघातून सुरुवात केली आहे पाचोरा भडगाव मतदार संघातील प्रत्येक गावात शेतकरी शिव संवाद यात्रा अतिशय उत्स्फर्त असा प्रतिसाद लाभत आहे. आज कजगाव येथे शेतकरी शिव संवाद यात्रेच्या निमित्त वैशालीताई सूर्यवंशी यांचे कजगाव जोरदार स्वागत करण्यात आले व गावात ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करून शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत होते, पाचोरा भडगाव मतदार संघातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची स्वतः ताई संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत शेतकऱ्यांचे शिवरस्त्यांची दुर्दशा, समशानभूमीच्या कामे रखडलेली गावातील रस्त्यांची दुरवस्था शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही अशा अनेक समस्या गावकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या व्यथा ताई समजून घेत आहेत व आपण आमदार म्हणून निवडून आल्यानंतर या समस्यांचे निवारण व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवू अशी ग्वाही वैशालीताईंनी ग्रामस्थांना यावेळी दिली आहे.
लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळ नाही शेतकऱ्यांचे कोणी वाली नाही, त्यांच्या समस्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे मतदारसंघातून शेतकरी शिव संवाद यात्रा च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन येणाऱ्या काळात त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू असे देखील वैशालीताई सूर्यवंशी यांनी सांगितले मतदार संघातील सध्याच्या कारभार अतिशय भ्रष्ट असून त्याला बदलण्याची सुवर्णसंधी ही निवडणूकीच्या माध्यमातून मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.