भडगाव तालुक्याच्या विकासासाठी व स्वाभिमानासाठी कोळगाव येथे शेतकरी व कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न.

(प्रतिनिधी – विलास पाटील)
कोळगाव:- भडगाव तालुक्यातील शेतकरी , कार्यकर्ता मेळावा कोळगाव येथील राज मंगल कार्यालयात नुकताच उत्साहात संपन्न झाला. यावेळी भडगाव तालुक्यातील व पाचोरा तालुक्यातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डी.आर.पाटील कृषी अधिकारी यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली. प्रसंगी तालुक्यातील विविध गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ व अन्य संस्थांचे पदाधिकारी देखील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीस मेळाव्याला संबोधित करताना पिचर्डे येथील राजू पाटील टेलर यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
तात्यासाहेबांनी तालुक्यासाठी खूप काही मदत केली आहे. त्यासाठी सर्वांनी एक व्हा आणि आपली ताकद दाखवून द्या आणि नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन उपस्थितांना केले. नंतर माजी सरपंच शिवाजी आत्माराम पाटील यांनी आपल्या मनोगतातून स्वाभिमान गहाण ठेवू नका, आणि निष्ठा काय असते आवाहन केले. नंतर सुरेश अर्जुन बोरसे कोळगाव यांनी सांगितले की लोकांच्या भूल थापांना बळी पडू नका आमच्या नानासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा आणि त्यांना निवडून आणा. नंतर भास्कर नाना पाटील पेंडगाव यांनी भडगाव तालुका ५२ वर्षापासून वंचित आहे. तरी आपल्या तालुक्याची अस्मिता जागृत ठेवून नानासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन केले. रघुनाथ नाना पाटील पांढरद यांनी सांगितले की तात्याबाबांनी पहिली शाळा कोळगाव या ठिकाणी सुरू केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नानासाहेबांनी देखील कोळगाव येथे शेतकरी मेळावा आयोजित केला. नंतर शिंदी येथील भालचंद्र धुडकू पाटील यांनी भडगाव तालुक्यातील सगळ्यांनी एकसंघ व्हावे आणि नानासाहेबांना विजयी करावे, कारण भडगाव तालुक्यात शिक्षण क्षेत्रात त्यांचे कार्य फार मोलाचे आहे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले. विश्वास रामा पाटील खेडगाव यांनी सांगितले कि शिक्षण क्षेत्रात एक नंबर विकास तात्या बाबांनी केला आणि नानासाहेबांनी केला. प्रा.उत्तम पाटील यांनी ही परिवर्तनाची लाट असून सर्वांनी नानासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. देविदास पाटील अंजनविहिरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. बी. वाय .पाटील वडजी माजी सरपंच म्हणाले कि हि आरपारची लढाई आहे. डॉ. पूनमताई पाटील यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले सामान्य जनतेचे प्रश्न नानासाहेबांच्या माध्यमातून सोडवू तसेच तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देऊ महिलां सक्षमीकरणावर भर देऊ व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देऊ असे आश्वासन याप्रसंगी दिले यावेळी विधानसभेचे इच्छुक उमेदवार नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांनी देखील उपस्थितांना मतांचे दान पदरात टाकण्याचे आवाहन केले. शेवटी अध्यक्षीय मनोगतात डी.आर .पाटील यांनी नानासाहेबांच्या उमेदवारीला साथ द्या असे आवाहन केले. कार्यक्रमासाठी शेतकरी व कार्यकर्त्या यांच्यामधून विश्वास रामा पाटील, अभिमान पाटील ,शिवाजी पाटील, भास्कर पाटील पेंडगाव, बी.वाय.पाटील वडजी, शामकांत अशोक भोसले माजी नगराध्यक्ष ,बाळासाहेब जगदीश अशोक पाटील जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी मानद सचिव, निंबा नारायण पाटील कोळगाव, सावदेकर आबा रघुनाथ पाटील, पांढरद विलास पाटील, पिंप्रीहाट कैलास माधवराव पाटील, कैलास रामदास पाटील, संतोष पाटील पिचर्डे, बाळू पाटील पिचर्डे ,कौतिक सोनवणे, संजीव पाटील, प्रकाश पाटील, महिंदळे अरुण पाटील, पिंप्री संभाजी पाटील, माजी सरपंच कोठली संभाजी पाटील .सावदे दीपक मोरे, माजी सरपंच पिंप्रीहाट, बाबूलाल पाटील, नाना रामदास पाटील, जुवार्डी प्रा. वसंतराव पाटील, प्रकाश पाटील, संजय पाटील कोळगाव, माजी सरपंच विश्वास शंकर पाटील, विश्वास भाऊसाहेब पिंप्री, मधुकर पाटील शिंदी ,उपसरपंच योगेश पाटील चेअरमन विकास सोसायटी पांढरद, चंदू कोळी माजी सरपंच पांढरद, विनायक पाटील, संजय पाटील माजी सरपंच आमडदे, धर्मराज भोसले, किशोर रघुनाथ पाटील आमडदे, डॉ. कमलेश भोसले यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक भोसले यांनी केले. याप्रसंगी शेतकरी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.