
(उपसंपादक – कल्पेश महाले)
भडगाव:- दिनांक ५ ऑक्टोबर रोजी भडगाव शहरात अखिल भारतीय जगतद्गुरु तुकाराम महाराज कुणबी पाटील बहुउद्देशीय विकास संस्था नगरदेवळा ता.पाचोरा संचलित संत मुक्ताबाई शिवण क्लासेस कडून उत्तीर्ण झालेल्या महिलांना नुकतेच प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच मुक्ताई शिवण क्लासेसचे प्राचार्य अनिल पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार केला. व मान्यवरांच्या हस्ते उपस्थित सर्व महिलांना शिवण क्लासचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, पत्रकार शालिग्राम पाटील, पत्रकार कल्पेश महाले, जिल्हा सचिव बापूराव पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा संघटक महेश पाटील, तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील, तालुका संघटक शेखर पाटील, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप पाटील व जिल्हा संपर्क प्रमुख खुशाल बिडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, सूत्रसंचालन पत्रकार कल्पेश महाले यांनी केले असून आभार मुक्ताई शिवण क्लासेसचे प्राचार्य अनिल पाटील यांनी मानले.