कजगाव येथील रेल्वे उड्डाण पुलावरील रस्त्याची दूरावस्था.

(कार्यकारी संपादक – संजय महाजन)
भडगाव:- तालुक्यातील कजगाव येथील पारोळा रस्त्यावरील श्री.चक्रधर स्वामी रेल्वे उड्डाण पुलावर मोठे-मोठ खड्डे पडल्याने छोटे वाहन चालवणे अवघड झाले असून या पुलावर गेल्या महिनाभरात अनेक अपघात झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने वाहनधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दोन वर्षापासून हा नवीन पुल वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला असून या पुलावर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असून सदर पुलावरील रस्त्याची दुरावस्था झाली आहे आणि क्षमातेपेक्षा जास्त माल घेऊन जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे या पुलावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. यासंदर्भात दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, भडगाव यांच्याकडे कजगाव येथील रहिवासी भूषण नामदेव पाटील यांनी तक्रार अर्ज केला असून तरी प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून, सदर रस्त्याचे काम हे चांगल्या प्रतीचे करण्यात यावे आणि क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांवर आरटीओ विभाग भडगाव व वाहतूक पोलीस भडगाव यांच्याकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.