
(उपसंपादक – कल्पेश महाले)
जळगाव:- जळगाव जिल्ह्यात बकाऱ्या चोरीचे प्रमाण वाढले असल्याने श्री.महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी श्री.बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेश दिलेत. त्यानुसार श्री.बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, पो.हवा.संदिप पाटील, हरीलाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, महेश पाटील, सागर पाटील, ईश्वर पाटील, दिपक चौधरी सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.
नमुद पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी तांत्रिक व गुप्त बातमीदारा मार्फत गोपनीय माहिती मिळाली की, चाळीसगांव ग्रामीण पो.स्टे. दाखल गुरक्र २८१/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे दाखल गुन्हा हा भवाळी ता.चाळीसगाव येथील राहणारा चेतन गायकवाड याने त्याचे साथीदारासह केला असल्याची बातमी मिळाली.
त्यावेळी नमुद अधिकारी व अमंलदार हे दोन दिवसापासून भवाळी ता.चाळीसगाव भागात पाळत ठेवून होते. त्यांना आज दिनांक ०३/१०/२०२४ रोजी खात्रीशीर बातमी मिळाली की, चेतन गायकवाड व त्याचे साथीदार गावात आले आहेत. त्यावेळी नमुद पथकाने गावात जावून चेतन गायकवाड व त्याचे साथीदार यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता चेतन गायकवाड याने सांगीतले की, त्याने व त्याचे सोबत असलेले गोरख फकीरा गायकवाड, बबलु आबा जाधव, गोरख सुरेश गोकुळ, सोमनाथ भिकन गायकवाड, गोकुळ गायकवाड व शंकर मोरे सर्व रा भवाळी ता चाळीसगांव अशांनी मजुरी व्यवसाय निमीत्त ते हिंगोणे परीसरात जात होते. तेव्हा तेथे त्यांनी एका शेतामध्ये पत्र्याच्या शेड मध्ये बकऱ्या असल्याची माहीती होती. म्हणुन त्या सर्वांनी मिळुन चारचाकी वाहनाने व मोटार सायकलने सदर ठिकाणी जावून तेथे खाटीवर झोपलेल्या इसमास धारदार शस्त्राचा धाक दाखवून शेड मधील १९ बोकड व ७ बकऱ्या त्यांनी सोबत आणलेल्या चार चाकी वाहनाने व मोटार सायकलने घेवुन जावुन विक्री केल्या. विक्रीतुन आलेली रक्कम त्यांनी वाटणी केली असे सांगीतल्याने तो व त्याचे इतर ४ साथीदार असे एकुण ५ आरोपी यांना ताब्यात घेवून त्यांचे कडून १,०९,०००/- रु. रोख व २६,०००/- रु. कि.ची गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल अशी एकुण मिळुन १,३५,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच उर्वरीत आरोपी गोकुळ गायकवाड व शंकर मोरे यांना चाहुल लागताच ते पळुन गेले म्हणुन ताब्यातील आरोपीतांना चाळीसगांव ग्रामीण पो.स्टे. दाखल गुरक्र २८१/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०९ (४), ३(५) या गुन्ह्याचे पुढील तपासकामी चाळीसगाव ग्रामीण पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई डॉ.श्री.महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, मा.श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.