नार-पार योजनेला मंजुरी दिलेली आहे, कॅबिनेटमध्ये काम सुरू करण्याचे टेंडर काढणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- (उपसंपादक – कल्पेश महाले)
जळगाव: जळगांव येथे दि. २५ ऑगस्ट रोजी जळगाव येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लखपती दीदी संमेलन झाले. या संमेलनाला महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
या संमेलनात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यातील नार-पार योजनेला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मान्यता देऊन आजच्या कॅबिनेटमध्ये नार-पार योजनेच्या कामाचे टेंडर काढण्यास मान्यता देत असल्याचे उपमुख्यमंत्री द्रेवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.
तसेच जळगाव जिल्ह्यातील वाघुर प्रकल्पासाठी २२८८ कोटी रुपये तर पाडळसे धरणासाठी ४८९०कोटी रुपये देण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जाहीर केले. नार-पार योजनेच्या मंजुरीमुळे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरासह जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळाल्याने सर्व शेतकरी सुजलाम सुफलाम होणार आहेत असेही यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल सि.पी. राधाकृष्णन, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, राज्यातील मंत्री, आमदार, खासदार, सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.