खेडी खेडगाव येथे सर्वज्ञ चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवाचे आयोजन..

खेडी खेडगाव येथे सर्वज्ञ चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवाचे आयोजन..
प्रतिनीधी कलीम सैय्यद..
चाळिसगाव तालुक्यातील खेडी खेडगाव येथे सर्वज्ञ चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवाचे आयोजन दिनांक ४ सप्टेंबर रोजी म.पंढरीकर म, अध्यक्ष धर्मचिंतन सेवाभावी ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळी खेडी खेडगाव व पंचक्रोशीतील संत महंत भक्त मंडळी यांनी केले आहे.
याकार्यक्रमास श्री पंचावतार उपहार तथा संत महंत वासनिकाचा भेट काळ सोहळा,प,पु,प,म, महाराष्ट्रधिकरण श्री मोठे बाबाजी आंबेवडगाव जळगाव व कै,प,पु,प,म वर्धनस्थ श्री मोठे बाबाजी रेणाईचे जळगाव यांची उपस्थिती राहणार आहे .
तसेच जळगाव जिल्हा महानुभव परिषदेचे विद्यमाने परब्रह्म अवतार जीवोद्धरण व्यसनिय सर्वांनी श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव भा शु द्वितीया बुधवार व गुरुवार दिनांक ४/५ सप्टेंबर २०२४ रोजी श्री दत्त मंदिर संस्थान खेडी खेडगाव येथे संपन्न होत आहे. या मंगल प्रसंगी पंच आवतार उपहार तथा संत महंत वासानिकाचा भेटकार्ड आयोजित केलेला आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे राहील.
बुधवार दिनांक ४ सप्टेंबर प्रातःकाळी ५ वाजता त्रिमूर्तीस मंगल स्नान, सकाळी ८ वाजता श्री मद्धगवद्रीता पाठ परायण,
सकाळी ९ वाजता धर्म वार्ता, सकाळी ११ वाजता श्री पंचावतार उपहार महोत्सव, दुपारी 3 वाजता पालखी सोभा यात्रा, सायंकाळी ८ वाजता चर्चासत्र …
गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी, प्रातःकाळी ५ वाजता श्री मूर्तीस मंगल स्नान, सकाळी ७ वाजता श्री मद्धगवद्रीता पाठ परायण, सकाळी ८ वाजता भेट काळ, सकाळी ९ वाजता ध्वजारोहन, सकाळी ९:३० वाजता धर्म सभा प्रारंभ, दुपारी १२ वाजता, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव, दुपारी १ वाजता आभार व महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजितकरण्यात आले आहे.