जळगांव – रावेर लोकसभा मतदारसंघात मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त.

जळगांव – रावेर लोकसभा मतदारसंघात मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त.
उपसंपादक – कल्पेश महाले
जळगांव – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यामध्ये जळगांव जिल्ह्यातील २ अप्पर पोलीस अधीक्षक, ९ डी.वाय.एस.पी., ३१ पोलीस निरीक्षक, ११९ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, जळगांव जिल्ह्यातील पोलीस अंमलदार २५५०, आणि बाहेरील पोलीस अधिकारी ७०, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.
बाहेरील जिल्ह्यातील पोलीस अंमलदार २३६० आणि ३०८५ होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. केरळ आणि कर्नाटक मधून कर्नाटक बी.एस.एफ आणि सी.आर.पी.एफ., सी.आय.एस.एफ. या कंपन्या मागविण्यात आल्या आहेत. स्ट्रॉंग रूमसाठी दोन एस.आर.पी.एफ प्लाटून आणि दोन सी.आर.पी.एफ. प्लाटून तैनात असणार आहे.
वरील सर्व बंदोबस्त पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्यामार्फत जळगांव आणि रावेर मतदार संघात रवाना झालेला आहे.