अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या चाळीसगाव तहसील कार्यालयातील महसूल पथकाकडून जप्त.

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या चाळीसगाव तहसील कार्यालयातील महसूल पथकाकडून जप्त.
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – तालुक्यातील वडगाव लांबे येथील गिरणा नदीपात्रातून अनाधिकृत अवैद्य गौण-खनिज वाळू बैलगाडीने वाहतूक करताना नरेंद्र प्रताप मोरे वय-२८ व संदीप प्रताप मोरे वय-३६ हे दोघे रा.वडगाव लांबे हे आढळून आले. त्यांच्याजवळ वाळू वाहतुकीबाबत चलन, पावती, परवाना आढळून न आल्याने अवैध गौण-खनिज वाहतूक प्रतिबंधक पथक तहसिल कार्यालय चाळीसगाव येथील श्री.विष्णु राठोड,मंडळ अधिकारी बहाळ भाग, श्री.अरुण निकम, तलाठी वडगाव लांबे, श्री.प्रकाश झाडे, तलाठी बहाळ यांच्या पथकाने पंचनामा करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या मेहूणबारे पोलीस स्टेशन येथे जमा करून बैलजोड्या मालकांच्या ताब्यात दिल्यात आणि सदरील पंचनामा तहसिल कार्यालय येथे सादर केला.
गिरणा नदी पात्रातून वडगाव लांबे – करगाव – चाळीसगाव या रस्त्याने नेहमी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या अनेक बैलगाड्या भर दिवसा आणि रात्री वाहतूक दररोज चालुच असते.
या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या कोणाच्या आशीर्वादाने रस्त्यावर वाहतूक करतात..?
आपल्या गावात किंवा परिसरात अवैध वाळू वाहतूक होते हे स्थानिक गावातील सरपंच, पोलीस पाटील यांना दिसत नसेल का..?
अश्याच धडक कारवाई नेहमी करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे आणि या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांकडून महसूल विभागातील पथकाचे कौतुक होत आहे.