मतदान जनजागृतीसाठी कासोदयाच्या मधुकर ठाकूर यांचा २००१ पासुन आगळा वेगळा प्रचार.

मतदान जनजागृतीसाठी कासोदयाच्या मधुकर ठाकूर यांचा आगळा वेगळा प्रचार.
प्रतिनिधी इम्रान शेख
कासोदा – जो तो आपला आपल्या पक्षाचा प्रचार, पार्टीचा प्रचार करताना आपण बघितलं असेल, पण समाजासाठी काहीतरी देणे लागतो, या विचाराने आपल्या बहुमूल्य मतदानाचे महत्त्व समजावून देण्यासाठी कासोद्याचे ६० वर्षाचे मधुकर ठाकूर हे २००१ पासून मतदारांमध्ये स्वयं खर्चाने मतदानाचा प्रचार करीत आहे.
आपल्या दुचाकी सायकलवर भोंगा स्पीकर व मोठा फलक लावून त्यावर मतदान करा, आपले एक मत आपले भविष्य आहे. मतदानाची टक्केवारी वाढवा, आपल्या गावाचे व शहराचे जिल्ह्याचे नाव अव्वल करा. मतदान करा, लोकशाहीला बळकट करा. पैशाला बळी पडू नका, आपले मत विकू नका. असे लिहिलेले फलक व माईक मध्ये बोलून मतदारांमध्ये जनजागृती कासोदा शहरातील ६० वर्षीय मधुकर ठाकूर हे करीत आहे.
या आगळ्यावेगळ्या प्रचाराचे कासोदा शहरातून व परिसरातून मधुकर ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आपला प्रपंच सांभाळून मिळेल त्या वेळेत समाजाला काही काळीमा फासणाऱ्या, बालविवाह, हुंडाबळी, व्यसनमुक्ती, झाडे लावा झाडे जगवा, विज बिल, उघड्यावर स्वच्छालय, वीज चोरी अत्याचार सारख्या विषयांवर मधुकर ठाकूर हे नेहमी नागरिकांमध्ये २००१ पासून जनजागृती करीत आहे.
आमच्या सत्यकाम न्युजचे प्रतिनिधी इमरान शेख यांनी श्री मधुकर ठाकूर यांच्याशी संवाद साधल्यावर चर्चा केली असता, मला समाजसेवा करण्याचा छंद आहे. आणि ही समाजसेवा मी २५ वर्षापासून करीत आहे. यात मला कोणतीही लाजलज्ज नाही, यात मला कोणीही हुशार या मूर्ख म्हणो मी ही समाजसेवा व लोकांमध्ये जनजागृती मी माझ्या स्वखुशीने स्वखर्चाने मी भविष्यातही करत राहणार आहे. आणि ते प्रत्येक माणसाने केलेच पाहिजे. असे माझे मत आहे असे त्यांनी त्यावेळी सांगितले.