Breaking
जळगाव

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकास वीस हजार रुपयाची लास स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ केली अटक

0 7 5 0 0 2

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकास वीस हजार रुपयाची लास स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ केली अटक

प्रतिनिधी कल्पेश महाले

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील दोघे लिपिक वीस हजार रुपयांचे लाच घेताना एसीबीच्या सापळ्यात अडकले असून दोघांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

महेश रमेशराव वानखेडे मुळ राहणार नेर जि. यवतमाळ आणि समाधान लोटन पवार रा. लालबाग कॉलनी पारोळा जि. जळगाव अशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत विभागातील दोघां लाचखोर लिपिकांची नावे आहेत.

या घटनेतील तक्रारदार ग्रामपंचायत निवडणूक 2021 मध्ये निवडून आले होते, रायपूर गावातील गैर अर्जदाराने निवडून आलेल्या तक्रारदाराच्या तीन अपत्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाकडे गैर अर्जदाराने तक्रार अर्ज दाखल केला होता.

लोकसेवक महेश वानखेडे या लिपिकाकडे या अर्जाचे कामकाज पेंडिंग होते. तक्रारदाराने लिपिक महेश वानखेडे यांची भेट घेतली होती तुमच्या तीन अपत्यांबाबत सकारात्मक अहवाल तयार करून देतो तुम्ही अपात्र होणार नाही तुम्ही मला मदतीच्या बदल्यात तीस हजार रुपये द्या असेल लिपिक महेश वानखेडे यांनी तक्रारदारास सांगितले होते.

तक्रारदारास लाज देण्याची मुळीच इच्छा नव्हती त्यामुळे त्यांनी एसीबी कार्यालय गाठून आपली कैफियत मांडली त्यानुसार पुढील कारवाई सुरू करण्यात आली. पडताळणी अंती दोघे दोषी आढळून आले वानखेडे यांच्या मागणीनुसार लिपिक समाधान पवार यांनी वीस रुपयांची लाज घेतली लाचेची रक्कम समाधान पवार यांनी स्वीकारताच एसीबी पथकाने समाधान पवार यास ताब्यात घेतले.

दोघांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपाधीक्षक सुहास देशमुख यांच्या अधिपत्याखाली पोलीस निरीक्षक एन एन जाधव यांच्या सह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील,पोलीस नाईक बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. कारवाईत पोलीस निरीक्षक अमोल वालझडे, पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस हवालदार रवींद्र घुगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शैला धनगर,पोलीस नाईक किशोर महाजन, पोलीस नाईक सुनील वानखेडे,पोलीस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने,पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींनी सहकार्य केले.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 0 0 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे